RBI

RBI: महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ने केली कारवाई, खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांना बंदी

386 0

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्र मधील एका बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. RBI ने शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर कारवाई केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती पाहता ही कारवाई करण्यात आल्यामुळे आता शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर बंदी घातली आहे. तसेच ही बँक आता कोणतीही नवीन कर्ज देऊ शकणार नाही आणि गुंतवणूक देखील करता येणार नाही.

बँकेची आर्थिक स्थिती डगमगली
RBI कडून आयडीएफसी फस्ट बँक आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्सवरही मोठी कारवाई केल्यानंतर शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे. या बँकेची आर्थिक स्थिती डगमगल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणालाही या बँकेत गुंतवणूक तसेच पुढील सहा महिने बँकेतून पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

ग्राहकांच्या पैशांचे काय?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत पैसे जमा केलेले ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करु शकतात. ज्या ग्राहकांच्या खात्यात 5 लाख रुपयापर्यंत रक्कम असेल त्यांना संपूर्ण पैसे मिळू शकतील. दरम्यान, या बँकेची आर्थिक स्थिती सुधारली जावी म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News

Related Post

व्यावसायिक होण्याचे स्वप्न राहिलं अपुरं; अर्ध्यावर डाव सोडत तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 31, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणपणी व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने कर्जाला (Loan) कंटाळून स्वतःवर…
Budget 2024

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Posted by - January 11, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर (Budget 2024) करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत…

#INFORMATIVE : डिमॅट आणि ट्रेडिंग खाते म्हणजे काय ? असा ओळखा फरक

Posted by - March 11, 2023 0
शेअरबाजारात गुंतवणूक करायची असेल तर डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट असणे गरजेचे असते. त्याशिवाय आपल्याला इक्विटी मार्केटमध्ये पैसा टाकता येत नाही.…
Phone Pe

फोन पे पेमेंट अ‍ॅपनं लॉन्च केली एग्रीगेटर सर्व्हिस; जाणून घ्या काय आहे सर्व्हिस आणि त्याचे फायदे

Posted by - June 8, 2023 0
फोन पे पेमेंट अ‍ॅपने काही दिवसांपूर्वी अकाउंट एग्रीगेटर सेवा सुरू केली आहे. फोन पे कंपनीने त्यांची सहकारी कंपनी PhonePe Technology…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *