Ramdas Athawale

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

291 0

मुंबई : रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीत तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच चुकीची असल्याचं म्हटलं आहे. यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात असून त्यांनी माझ्याकडून शिकायला हवं असं म्हटलंय. तसंच महायुतीत माझा अपमान झाला तरी मी मोदीजींच्या विचारासोबत असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच त्यांनी आपण मागितलेल्या जागा न मिळाल्याने नाराजीदेखील व्यक्त केली आहे.

नेमके काय म्हणाले रामदास आठवले?
महायुतीत माझा अपमान झाला. तरीही मी महायुतीसोबत आहे. मी पंतप्रधान मोदींच्या विचारासोबत आहे. मी शिर्डीची जागा मागितली होती पण मला मिळाली नाही. मला जागा देण्यास राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध केला. जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी नेहमी त्यांना पाठिंबा दिला होता. आता मी त्यांच्या मुलासाठी प्रचार करणार नाही असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.

शिर्डीच्या जागेशिवाय आठवले यांनी आणखी दोन जागांचे तिकिट मागितले होते. यामध्ये सोलापूर आणि इशान्य मुंबईच्या जागेचा समावेश होता. त्या जागासुद्धा मला दिल्या नाहीत. त्यामुळे आता आम्हाला कॅबिनेट मिनिस्ट्री मिळायला हवी अशी मागणी आठवले यांच्याकडून करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Related Post

city of dreams

City Of Dreams 3 : बहुप्रतिक्षित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आऊट

Posted by - May 12, 2023 0
मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याअगोदर या सीरिजचा धमाकेदार टीझर…

संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा!; रोहित पवारांची खास पुणेरी शैलीत अमित शाह यांच्यावर टीका

Posted by - February 19, 2023 0
पुणे: देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्या…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : शिवसंग्राम फाउंडेशनचा रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा

Posted by - May 9, 2024 0
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे राष्ट्रीय काँगेस पक्षाकडून उमेदवार आहेत. आम्ही त्यांचे सामाजिक आणि राजकीय काम अनेक…
Milind Deora

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Posted by - January 14, 2024 0
मुंबई : काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (Milind Deora)…

लालपरी येतेय पूर्वपदावर ; सात दिवसांत 340 कर्मचारी कामावर रुजू

Posted by - April 17, 2022 0
मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून आता हा संप अंतिम टप्प्यात आला असून संपातील एसटी कर्मचारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *