Pune Accident Video

Pune Accident Video : पुण्यात भरधाव कारची दोघांना धडक ! CCTV फुटेज आलं समोर

423 0

पुणे : पुण्यातील वारजे भागामध्ये काल रात्री एक भीषण अपघात (Pune Accident Video) घडला आहे. यामध्ये एका भरधाव कारने दोघांना धडक दिली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुणे-बाहुली मार्गावर एनडीएच्या कोंडावे गेटजवळ एका भरधाव कारने दोन तरुणांना जोरदार धडक दिली. पिकॉक हॉटेलसमोर झालेल्या या भीषण अपघातामध्ये रस्त्याच्या बाजूने चालणारे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

कसा घडला अपघात?
गुरुवारी रात्री 9 वाजून 48 मिनिटांनी ही दुर्घटना घडली असून रस्त्याच्या बाजूने दोन तरुण मोबाईलमध्ये पाहत चालत असताना गाड्या जात असल्याचेही व्हिडीओ मध्ये दिसत आहे. रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या दोघांनाही अचानक एक भरधाव वेगातील कारची धडक इतक्या जोरात बसली की दोघेही काही फुटांपर्यंत उडाले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता तसाच पुढे निघून गेला.

या प्रकरणामध्ये उत्तम नगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये हीट अ‍ॅण्ड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारचालकाबद्दलची काही माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rajashree Patil : चर्चेतील चेहरा : राजश्री पाटील

Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Related Post

माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

Posted by - June 4, 2022 0
पुणे- अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या…

कंपनीत कामाला जातो सांगून निघाला, अन् केलं ‘हे’ कृत्य

Posted by - June 30, 2023 0
कंपनीत कामाला जातोय, असे घरी सांगून, एका खासगी कंपनीमध्ये काम करण्याऱ्या एका २० वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची…
Football

फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू

Posted by - May 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एल साल्वाडोर स्टेडियममध्ये (El Salvador Stadium) फुटबॉल सामन्यादरम्यान (Football Match) एक मोठी दुर्घटना घडली आहे.…
Murder Video

Murder Video : तरुणीने लग्नाला नकार दिल्याने आरोपीकडून तरुणीची हत्या

Posted by - July 10, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी एका तरुणीची तिच्याच प्रियकराने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या (Murder Video) केली…

चंद्रकांत पाटील यांना हवं ते मंत्रीपद मिळाल नसेल म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडलीय – अजित पवार

Posted by - October 8, 2022 0
पिंपरी चिंचवड : एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *