Suresh Mhatre

Suresh Mhatre : तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या बाळ्या मामांचे विजयी होण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का?

394 0

भिवंडी लोकसभेसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल सात वेळा पक्ष बदललेल्या म्हात्रेंचे खासदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण होईल अशी अपेक्षा म्हात्रेंना आहे. पाहूया नेमके कोण आहेत सुरेश म्हात्रे? आणि कसा आहे त्यांचा आतापर्यंतचा इतिहास…

सुरेश म्हात्रे हे अनेक वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजाच्या समोर आले. त्यांनी विविध सामाजिक संस्था संघटनांबरोबर काम केले. सध्या इथे धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मवीर मित्र मंडळ, तेजस्वी एज्युकेशन सोसायटी यासारख्या सामाजिक संस्थांचे अध्यक्ष म्हणून काम करतात. अनेकांना त्यांनी आर्थिक मदत केल्यामुळे भिवंडीत मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या आगरी समाजात त्यांना मानणारा मतदार वर्ग मोठा आहे. सामाजिक कारकिर्दी बरोबरच त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द 1996 मध्ये सुरू केली. 1996 मध्ये त्यांना शिवसेनेचे शाखा प्रमुख पद देण्यात आले तर 2000 मध्ये शिवसेना विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. पुढे 2004 मध्ये शिवसेना भिवंडीच्या उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेने तर्फे निवडणूक लढवली.

मात्र त्यानंतर 2011 मध्ये म्हात्रे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला व भिवंडीच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2013 मध्ये मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली. त्यानंतर पुन्हा 2014 मध्ये म्हात्रेंनी भिवंडीतून मनसेतर्फे निवडणूक लढवली. यावेळी देखील त्यांच्या विरोधात कपिल पाटील हेच उमेदवार होते. 2015 साली त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला व ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख म्हणून काम केले. पुढे 2017 मध्ये ठाणे जिल्हा परिषद सदस्यपदी त्यांची निवड झाली. 2018 साली ठाणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेते पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2022 मध्ये पुन्हा त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. भिवंडी लोकसभेच्या संपर्कप्रमुख पदी त्यांची वर्णी लागली. तर 2024 ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि अखेर काल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली.

सुरेश म्हात्रे यांनी तब्बल 7 वेळा पक्ष बदलले. मात्र निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळवता आला नाही आणि आता अखेर या निवडणुकीत त्यांना विजय खेचून आणण्याची संधी शरद पवारांच्या माध्यमातून मिळाली आहे. कपिल पाटील हे दिग्गज नेते असले तरीही सुरेश म्हात्रे उर्फ बाळ मामा हे त्यांना तगडी लढत देतील, अशीच शक्यता आहे. त्यामुळे बाळूमामांचे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का? हे आगामी काळात कळेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Shirur Lok Sabha

Shirur Lok Sabha : राष्ट्रवादी Vs राष्ट्रवादीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? शिरूर लोकसभेत दोन्ही पवारांची ताकत पणाला लागणार

Posted by - March 26, 2024 0
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश (Shirur Lok Sabha) केला.…
Sharad Pawar and Jayant Patil

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Posted by - February 22, 2024 0
मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून मंचरमध्ये शक्तीप्रदर्शन करण्यात…
Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

Sharad Pawar : अजितदादांचे गौप्यस्फोट खरे की खोटे? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 2, 2023 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवारांबाबत (Sharad Pawar) गौप्यस्फोट केले. अजित पवारांच्या या…
Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना परळीत मोठा धक्का ! मुंडेंचे ‘हे’ खंदे समर्थक जाणार शरद पवार गटात

Posted by - August 17, 2023 0
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीत मोठा धक्का बसला असून मुंडे (Dhananjay Munde) यांचे खंदे समर्थक बबन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *