Kaia Arua

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

555 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पापुआ न्यू गिनीची महिला क्रिकेटर काया अरुआ हिचे निधन (Pass Away) झाले आहे.आयसीसीकडून याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काया अरुआ हिची कारकीर्द
काया अरुआने 2010 मध्ये पहिल्यांदा पापुआ न्यू गिनीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अरुआने 39 टी-20 सामन्यात पापुआ न्यू गिनीचं नेतृत्व केलं. त्यापैकी 29 सामने जिंकले होते. तर यात तिने 59 विकेटही घेतल्या. अरुआ ही पापुआ न्यू गिनीची पहिली क्रिकेटर आहे जिने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये इतक्या विकेट घेतल्या आहेत. जपानविरुद्ध 4 षटकात 7 धावा देत 5 विकेट घेण्याची कमाल तिने केली होती. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.

काया अरुआ हिने 2018 मध्ये टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पीएनजीचं नेतृत्व तिने केलं होतं. त्याच वर्षी आयसीसी महिला वर्ल्ड डेव्हलपमेंट टीममध्येही तिला नामांकन मिळालं होतं. अरुआच्या नेतृत्वाखाली पूर्व आशिया प्रशांत टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. 2019 च्या वर्ल्ड कप क्वालिफायर आणि 2021 च्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायरच्या दोन्ही स्पर्धेत तिला संघात संधी मिळाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Bishan Singh Bedi Passed Away

Bishan Singh Bedi Passed Away : भारताचे माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन

Posted by - October 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये सध्या वर्ल्ड कप 2023 खेळवला जात आहे. यादरम्यान भारतीय क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी…

पुणे : मुकुंद लागू यांचे निधन

Posted by - October 13, 2022 0
पारधी समाजसेविका सुमन काळे हत्याकांड प्रकरणात न्यायालयीन लढा उभारून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून झटणारे राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते…
Cricket Retirement

Cricket Retirement : टीम इंडियाला मोठा धक्का ! 5 व्या टेस्टपूर्वी ‘या’ स्पिनरने घेतली तडकाफडकी निवृत्ती

Posted by - March 5, 2024 0
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील (Cricket Retirement) अखेरचा सामना 7 मार्च रोजी होणार आहे. मात्र…
Ben Stokes

बेन स्टोक्सने टेस्टमध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कॅप्टन

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड (England) आणि आयर्लंड (Ireland) या दोन संघातील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *