Malegaon News

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

362 0

मालेगाव : नाशिकमधून (Malegaon News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे भरदुपारी गावाजवळ असणाऱ्या विहिरीत पाणी आणायला गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निताबाई जाधव आणि मुलगी इच्छामणी जाधव अशी मृत पावलेल्या मायलेकींची नावे आहेत.

काय घडले नेमके?
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या झोडगे इथं पाणी भरायला आणि कपडे धुण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या. त्यावेळी विहिरीतील पाणी काढत असताना मुलगी विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी आईने उडी मारली. पण दोघीही बुडून मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे. शेळ्या-मेंढ्या चारणारे घरी परतत असताना त्यांच्या लक्षात ही बाब आली. स्थानिकांनी त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

धक्कादायक म्हणजे निताबाई जाधव आणि त्यांची मुलगी इच्छामणी या ज्या विहिरीत पाणी आणायला गेल्या होत्या त्या विहिरीला बांधलेला कठडा नव्हता. दरम्यान, पोलीसात या प्रकऱणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Kalubai Temple

Kalubai Temple : काळूबाईचे मंदिर ‘या’ कारणामुळे 5 दिवस राहणार बंद

Posted by - January 6, 2024 0
सातारा : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीचे (Kalubai Temple) मंदिर…
Solapur Crime News

Solapur Crime News : खळबळजनक ! स्वतःवर गोळी झाडून प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

Posted by - August 4, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूर (Solapur Crime News) शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक…
Manoj Jarange

Manoj Jarange : मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद नाही

Posted by - January 2, 2024 0
जालना : मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याला सुरुवात केली. या नोंदी शोधत असताना…

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या, खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

Posted by - May 29, 2022 0
पुणे- ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *