Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

239 0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होत व अशातच भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला. अशातच नवनीत राणा यांनी मतदारांना विनंती केली असून त्या म्हणाल्या, माझं योगदान भाजपमध्ये शून्य सुद्धा नाही, मी फक्त सुरूवात केली आहे. मी फक्त तुम्हाला विनंती करू शकते की, विरोध करणाऱ्यांना आपण आपली ताकद दाखवली पाहिजे मग अचलपूर मतदारसंघ असो, किंवा मेळघाट विधानसभा असो जिथे कोणी उमेदवार पोहचू शकणार नाही तिथे मी पोहोचले, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. तर कोण आहेत नवनीत राणा? काय आहे त्यांचा राजकीय प्रवास पाहुयात…

नवनीत राणा यांचा जन्म मुंबईमधला असून 12 वी नंतर मॉडेलिंगला सुरवात केली मग दर्शन या कन्नड चित्रपटातून त्यांनी पदार्पण केल त्यानंतर सीनू वासंती लक्ष्मी मधून तेलगूमध्ये पदार्पण केल चेतना जगपती, गुड बॉय आणि भूमा हे तिचे काही चित्रपट आहेत. अतिरिक्त कामात कालचक्रम, टेरर, फ्लॅश न्यूझ आणि जबिलम्मा यांचा समावेश आहे जो तेलगूमधील चमेली या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. 2011 मध्ये रवी राणाबरोबर लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यावेळी रवी राणा हे अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. नवनीत राणा यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु या निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळांकडून नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला. तिने पराभवाचे कारण सांगितले की तिची स्पर्धा अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याशी होती, ज्यांनी तत्कालीन विजयी उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी रॅली केली होती.

2019 मध्ये लोकसभेसाठी शिवसेना-भाजपा युती होती आणि आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते. यावेळी नवनीत राणा मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडून आल्या. या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला होता. अमरावतीतून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 2019 मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या. त्यांचा विजय हा विदर्भातील शिवसेनेच्या दुर्लक्षित बालेकिल्ल्यात अपक्ष उमेदवाराचा मोठा विजय मानला जात होता. हे निवडून आले तेव्हा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, पण निवडून आल्यानंतर मात्र त्यांचं राजकारण हे भाजपधार्जिणं राहिलेलं आहे.

विविध स्तरांवर (म्हणजे स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय; सार्वजनिक किंवा लोकसभेसारख्या विविध संस्थांमध्ये) त्या वेळोवेळी शिवसेना आणि पक्षाच्या सदस्यांशी वाद घालताना दिसतात. खासदार झालेल्या नवनीत राणांचा शिवसेनेसोबत आणि अडसुळांसोबत संघर्ष मात्र 2014 मध्येच सुरू झाला होता. 2014 मध्ये राणा यांनी अडसूळांवर निवडणुकीदरम्यान विनयभंगाचा आरोप केला होता जो अडसूळांनी नाकारून लावला. नवनीत राणा नेहमी राजकीय पटलावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्र भाजपात फेरबदल होणार? आशिष शेलार चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं दिल्लीला रवाना

Posted by - June 7, 2024 0
नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळवता आलं असून आता…
Sanjay Raut

Sanjay Raut : 4 राज्यांच्या निकालावर संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - December 3, 2023 0
मुंबई : आज 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते…

वाळू ठेकेदार ते साखरसम्राट ; कसा आहे अभिजीत पाटील यांचा प्रवास ?

Posted by - August 27, 2022 0
पंढरपूर येथील तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांच्यावर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू झालं आहे. अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत राज्यात…
Amol-Mitkari-Jitendra-Awhad

Ajit Pawar : “दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कायम हुजरेच राहतील; मिटकरींची आव्हाडांवर टीका

Posted by - July 13, 2023 0
मुंबई : काल मंत्रिमंडळाचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) व प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री…
Pune News

Pune News : पुण्यात जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार

Posted by - August 28, 2023 0
पुणे : आज पुण्यामध्ये (Pune News) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *