Crime News

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

422 0

नवी दिल्ली : बरेच लोक दुसऱ्या शहरात गेल्यावर (Crime News) किंवा बाहेर कुठे फिरायला गेल्यावर हॉटेल रूम बुक करतात. मात्र, काहीवेळा या हॉटेल रूम मध्ये गेस्ट भयानक पाऊल उचलायचे बरेच धक्कादायक प्रकार उघडकीस येतात. असेच मन हादरवणारं प्रकरण समोर आलं असून पोलिसदेखील गोंधळात पडले आहे.अरुणाचल प्रदेशमधील एका हॉटेलमध्ये केरळचे तीन लोक मृतावस्थेत आढळून आले असून त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

केरळमधील कोट्टायम येथील नवीन थॉमस (वय 39) हे तिरुवनंतपुरम येथील रहिवासी असून त्याची पत्नी देवी बी (39) आणि पत्नीची मैत्रीण आर्य बी नायर (29) यांच्यासोबत 28 मार्च रोजी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले. मात्र सोमवारपासून तिघेही न दिसल्यामुळे मंगळवारी संशय आल्यामुळे कर्मचाऱ्याने तापस सुरु करताच रुम आतून बंद असल्यामुळे दरवाजा तोडला तेव्हा त्यांना तिघांचेही मृतदेह आढळले.

अधिकाऱ्याने अधिक माहिती देत सांगितले की “नायरचा मृतदेह पलंगावर होता आणि तिचं मनगट ब्लेडने कापलेलं होतं. तर देवी बी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि मनगटाच्या उजव्या बाजूला कापल्याच्या खुणा दिसत होत्या.थॉमस चा मृतदेह वॉशरूम मध्ये आढळला असून डाव्या हाताच्या मनगटावर जखेमच्या खुणा होत्या. तिरुअनंतपुरममध्ये नायर बेपत्ता असल्याची एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Suicide News

Suicide News : आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - July 15, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपासून लोकांमध्ये आत्महत्यांचे (Suicide News) प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाणदेखील खूप आहे. कधी दुष्काळ…

National Crime Records Bureau : महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार राजस्थानात ; महाराष्ट्र 4 क्रमांकावर 

Posted by - July 22, 2022 0
मुंबई : देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात राजस्थान प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.…
pune police

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली

Posted by - April 4, 2023 0
पुणे: पुणे शहरातील लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *