1 April

New Financial Rules : लोकांच्या खिशाला बसणार कात्री ! ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

318 0

आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात (New Financial Rules) होत असून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाले आहेत. नवीन आर्थिक वर्ष लागू झाल्याने आजपासून काही नवे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. 2024-2025 हे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू झाले असून या नवीन आर्थिक वर्षात कोणत्या नियमांत बदल करण्यात आले ते जाणून घेऊया…

नवीन कर प्रणाली डिफॉल्ट
नवीन आर्थिक वर्षात नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली आखण्यात आली आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना खास लक्ष द्यावे लागणार आहे.जर तुम्ही आयकर रिटर्न भरताना जुनी कर व्यवस्था निवडली नसेल, तर तुम्ही आपोआप नवीन कर प्रणालीमध्ये शामिल व्हाल. या अंतर्गत तुम्हाला आपोआप कर भरावा लागणार आहे. नव्या कर प्रणालीत 7 लाख रुपयापर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरावा नाही लागणार.

एलपीजी सिलेंडर स्वस्त
आजपासून एलपीजी सिलेंडर स्वस्त होत असून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली असून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 30.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

केवायसी नसल्यास फास्टॅग होणार बंद
आजपासून केवायसी नसल्यास फास्टॅग बंद होऊन फास्टॅग निष्क्रिय होणार आहे. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट केली नसेल तर टोल भरणं कठीण होणार आहे. .

एनपीएस खाते लॉगिन नियम बदलला
एनपीएस खात्यात लॉगिन करण्यासाठीचे नियम आजपासून बदलण्यात आले असून एनपीएस खात्यात लॉगिन करण्यासाठी, तुम्हाला आयडी पासवर्डसह आधारकार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करणे शक्य होणार आहे.

ईपीएफओ खाते हस्तांतरण
एखाद्या कर्मचाऱ्याने नवीन आर्थिक वर्षात नोकरी बदलली तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खाते आपोआप नवीन कंपनीकडे हस्तांतरित केले जाईल. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना खाते हस्तांतरित करण्यासाठी निवेदन द्यावे लागत होते, आता त्याची गरज पडणार नाही आहे.

विमा पॉलिसी नियमांमध्ये बदल
आजपासून विमा पॉलिसी सरेंडर करण्याकरिता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आता सरेंडर व्हॅल्यू तुम्ही किती वर्षांनी पॉलिसी सरेंडर केली आहे, यावर अवलंबून असणार आहे.

औषधे महागणार
1 एप्रिलपासून अनेक औषधांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. औषध किंमत नियामकाने नॅशनल लिस्ट ऑफ अत्यावश्यक औषधांच्या अंतर्गत पेन किलर, अँटीबायोटिक्स आणि अँटी-इन्फेक्शन औषधे यासारख्या काही आवश्यक औषधांच्या किमती मध्ये वाढ करण्यात आले आहेत. दर वाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे.

SBI च्या ग्राहकांना पडणार फटका
SBI डेबिट कार्डचे वार्षिक देखभाल शुल्क आजपासून वाढवण्यात आले असून SBI च्या ग्राहकांना फटका बसणार आहे. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डद्वारे भाडे पेमेंट केल्यावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट देखील आजपासून उपभोगता येणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

T-20 World Cup : T-20 वर्ल्डकपमध्ये विकेटकिपर म्हणून कोणाची लागणार वर्णी?

Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला डाव; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Related Post

महत्वाची माहिती : बेरोजगारांना केंद्र सरकार महिन्याला देणार 6 हजार रुपये? केंद्राने दिले हे स्पष्टीकरण

Posted by - October 29, 2022 0
नवी दिल्ली : सध्या लॉकडाऊननंतर भारतामध्ये बेरोजगीचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाकाळात देखील अनेक तरुणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात आता सायबर…

Gold Price Hike : दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! सोन्याने गाठला आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

Posted by - October 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या (Gold Price Hike) दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला…
Money

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Posted by - November 25, 2023 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजनेने दुर्गम ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना बँकिंग सेवांशी जोडण्यात मदत केली होती. झिरो बॅलन्सवर…

अर्थकारण : विम्यासाठी दावा करताना आवश्य घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

Posted by - July 15, 2022 0
अर्थकारण : वाहन, आरोग्य, जीवन विमा यासाठीच्या दाव्याच्या प्रक्रिया भिन्न असल्या तरी दोन गोेष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे वेळ आणि…
HDFC

एचडीएफसी फायनान्सचे एचडीएफसी बँकमध्ये होणार विलीनीकरण

Posted by - April 4, 2022 0
नवी दिल्ली- हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण होत आहे. विलीनीकरणाच्या या करारांतर्गत एचडीएफसी बँकेत 41% वाटा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *