Sunetra Pawar

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

240 0

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदार संघाकडे राज्याचेच नाहीतर देशाचं लक्ष लागलेलं असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. नणंद विरूद्ध भावजयमधील लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसाच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया…

सुनेत्र पवार या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, बारामती, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया (एनजीओ) बारामतीच्या अध्यक्ष आहेत. त्यासोबतच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवार यांना उल्लेखनीय कार्याबद्दल चिंचवड देवस्थान तर्फे ‘श्रीमत् महासाधू श्रीमोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार 2021’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार 2023’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार पुणे. लोकमत तर्फे ‘आऊटस्टँडींग वुमन अ‍ॅवार्ड’ आणि ‘लोकमत आयकॉन पुरस्कार, पुणे. तर ग्रामीण भागात जागरूकता निर्माण केल्याबद्दल ईटी जेन नेक्स्ट आयकॉन्स पुरस्कार आणि राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2024 असे पुरस्कार मिळाले आहेत.

सुनेत्रा पवार यांचं आरोग्य क्षेत्रामध्येही योगदान असून यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, कर्करोग जनजागृती तसेच मासिका जागर अभियान, महिलांसाठी आरोग्यविषयक शिबीरांचे आयोजन त्यांनी केलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्या प्रतिष्ठान तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं आहे. विज्ञान प्रदर्शन आणि जत्रांच्या माध्यमातून मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन दिलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 23 वर्षापासून समाजाच्या विविध क्षेत्रात सातत्याने कार्यस्त आहेत. काटेवाडी गावात त्यांचं सन 2000 पासून सामाजिक कार्य सुरु आहे. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सुनेत्रा पवारांनी सातत्याने काम केलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : “अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Posted by - December 12, 2023 0
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी…
eknath Shinde

2024 ला नरेंद्र मोदी सर्व रेकॉर्ड मोडतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

Posted by - May 25, 2023 0
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या रत्नागिरीच्या (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे…

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Posted by - May 21, 2024 0
छत्रपती संभाजीनगर: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन तरुणाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी…

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून; 6 दिवस चालणार प्रत्यक्ष कामकाज

Posted by - August 11, 2022 0
मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार…

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट

Posted by - September 8, 2023 0
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *