Govinda

Govinda : गोविंदाचा पत्ता कट; उत्तर पश्चिम मतदार संघात दिसू शकते मराठमोळी अभिनेत्री?

428 0

राज्यातील काही जागांच्या वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. एक पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत स्पष्टता पक्षांमध्ये दिसून येत नाही. मात्र आता एका जागेवर चक्क उमेदवारच मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात शिंदे गटाला प्रसिद्ध सिने अभिनेता गोविंदा याला उमेदवारी द्यायची होती मात्र आता गोविंदाच्या जागेवर एखाद्या मराठमोळ्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महायुतीतील फॉर्मुल्यानुसार उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे. या जागेवर या आधीच महाविकास आघाडी कडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच जागेवर अमोल कीर्तीकर यांचे वडील आणि शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी मिळताच गजानन कीर्तिकर हे इच्छुकांच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यामुळे या जागेवर अभिनेता गोविंदा याच्या नावाची ही चर्चा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वीच गोविंदाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यालाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र गोविंदाच्या नावाला स्थानिक नेत्यांचा विरोध असून मराठी भाषिक लोकसंख्या या भागात जास्त असल्यामुळे या जागेवर‌ हिंदी अभिनेत्याला उमेदवारी देऊ नये, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.

अभिनेता गोविंदा याने आधी सुद्धा राजकारणात नशीब आजमावले होते. त्यावेळी त्याचे विरोधक असलेले राम नाईक यांनी त्याच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात वर्चस्व होते. त्यांना पाडण्यासाठी काँग्रेसकडून गोविंदाला उमेदवारी देण्यात आली. आणि गोविंद त्याने पाच वेळचे खासदार असलेल्या नाईक यांचा पराभव केला. मात्र या निवडणुकीमध्ये गोविंदाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि बिल्डर हितेन ठाकूर याची मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. राम नाईक यांनी लिहिलेल्या चरैवेति! चरैवेति!! या पुस्तकात त्यांनी याबाबतचा खुलासा केला. प्रचारासाठी लागणारा पैसा दाऊद इब्राहिम आणि ठाकूर कडून घेतल्याचा गंभीर आरोप गोविंदावर करण्यात आला होता. मात्र पुढे जाऊन गोविंदाने राजकारणातून संन्यास घेतला.

या भागात मुंबईतील प्रसिद्ध फिल्म सिटी आहे. तसेच अनेक सिने अभिनेते, अभिनेत्रींचं वास्तव्य देखील आहे. याच भागातून प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त हे सुद्धा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या भागात सिने कलाकाराला संधी देण्यात येऊ शकते. शिंदे गट एखाद्या मराठमोळ्या अभिनेत्रीला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. मात्र तिचा शोध अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे गोविंदाला डावलून मराठमोळा अभिनेता किंवा अभिनेत्री या जागेवर उमेदवार म्हणून दिसणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bharat Ratna Award : भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले ‘हे’ दिग्गज; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते झाले वितरण

Ajit Pawar : आधी विरोध केला आता प्रचार करणार; अजितदादांच्या विरोधकांना यंदा करावा लागणार त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार

LokSabha : शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

Share This News

Related Post

Pune News

Pune News : धरणाच्या पाण्याचा अंदाज चुकला अन्; पुण्यातील बापलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यातील जयतपाड या ठिकाणी असणाऱ्या भाटघर धरणाच्या (Pune News) बॅकवॉटरमध्ये बुडून बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिलमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी

Posted by - October 24, 2022 0
कारगिल: देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम…
Love Jihad

Love Jihad : वांद्रे टर्मिनस येथे लव्ह जिहादच्या आरोपाखाली तरुणाला मारहाण

Posted by - August 16, 2023 0
मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या (Love Jihad) आरोपाखाली मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा…

इंधनावरील कर कमी करा, पंतप्रधानांच्या बिगर भाजप शासित राज्यांना कानपिचक्या

Posted by - April 27, 2022 0
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन गैर भाजप शासीत राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी पेट्रोलचे भाजपशासीत…

रायगड : “तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं… !” उदयनराजे संतापले

Posted by - December 3, 2022 0
रायगड : आज उदयनराजे भोसले यांचा रायगडावर “निर्धार शिवसन्मानाचा” मेळावा सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *