Vinod Tawde

विनोद तावडे यांच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या समितीत झाला समावेश

6631 0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून नुकतीच जाहीरनामा समितीची घोषणा करण्यात आले असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

एकूण 27 जणांची ही जाहीरनामा समिती असून या जाहीरनामा समिती महाराष्ट्रातील नेते माजी शिक्षण मंत्री आणि सध्याचे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आलाय.


2019 च्या लोक विधानसभा निवडणुकीवेळी विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं मात्र त्यानंतर वर्षभराच्या कालावधीतच विनोद तावडे यांचा पुनर्वसन करत राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर वर्षभरातच विनोद तावडे यांनी केंद्रात आपल्या नेतृत्वाची अशी काही चुणूक दाखवून दिली की विविध जबाबदाऱ्या या विनोद तावडे यांच खांद्यावर राष्ट्रीय पातळीवर देण्यात आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी ही विनोद तावडे यांनी काही काळ सांभाळली त्यानंतर आता त्यांचा थेट जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनाही या जाहीरनामा समितीत स्थान देण्यात आला आहे.

 

Share This News

Related Post

हिंजवडीमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मुलीचा मृतदेह (व्हिडिओ)

Posted by - March 31, 2022 0
पिंपरी- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क जवळ मुळा नदी शेजारी अतिशय निर्जनस्थळी एका झाडावर एका मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली…

दिल्लीत भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू, 30 झोपड्या जळून खाक

Posted by - March 12, 2022 0
नवी दिल्ली- दिल्लीतील गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी-शनिवारी रात्री उशिरा आग लागल्याचे वृत्त…

#NEWS DELHI : आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय बनल्या दिल्लीच्या नव्या महापौर

Posted by - February 22, 2023 0
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर अखेर बुधवारी दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी…
FIR

एनडीएतील उच्च पदस्थ अधिकार्‍याला डांबून ठेवत केली मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Posted by - June 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये कौटुंबिक वादातून एनडीएतील उच्चपदस्थ अधिकार्‍याला निवृत्त न्यायाधीश पत्नी, निवृत्त कर्नल…

किसान सभेच्या राज्य अधिवेशनात शाळा बंदीच्या निर्णया विरोधात ठराव

Posted by - November 1, 2022 0
पुणे : आज दिनांक २.१०.२०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत राज्य सरकारने वीस पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याबाबतची चर्चा झाली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *