Sirsasana

Sirsasana : शीर्षासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

164 0

खाली डोकं आणि वर पाय..योगसाधनेबद्दल आधी जो उल्लेख केला…त्या स्थितीतले, हटयोग प्रकारातले मुख्य, सुप्रसिद्ध आसन म्हणजेच ’शीर्षासन’ (Sirsasana).शीर्षासन हा संस्कृत शब्द असून शीर्ष आणि आसन ह्या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. ह्यामध्ये शीर्ष म्हणजे डोकं आणि आसन याचा अर्थ मुद्रा असा आहे. शीर्षासनाचा अभ्यास खाली डोकं आणि वर पाय उचलून केलेल्या स्थितीत केला जातो. इंग्रजीमध्ये ह्या आसनस्थितीला हॅंडस्टॅंड पोज असेही म्हणतात.

शीर्षासन करण्याचे फायदे
शरीराचं संतुलन वाढवण्यात मदत : आपल्या शरीराला मजबूत बनवण्याखेरीज शीर्षासन आपली संतुलन क्षमता उत्तम प्रकारे वाढवते. शीर्षासन करताना पुन्हा पुन्हा खाली न पडता चांगल्या प्रकारे तोल सांभाळता आला की आपली संतुलन क्षमता वाढीस लागते.

मूड प्रसन्न करते : शीर्षासन केल्यामुळे आपल्या मस्तकातील रक्तप्रवाह वेगाने वाढतो आणि यामुळे आपल्याला अगदी शांत वाटतं. मनावरचा सगळा ताण-तणाव दूर होतो. त्याशिवाय हे आसन केल्यामुळे आपल्या शरीरात कोर्टिसोल नावाचं हार्मोन बनण्याची प्रक्रिया मंदावत जाते आणि त्यामुळे आपल्याला ऍन्क्झायटीसारख्या समस्यांपासून चांगला आराम मिळतो.

शक्तीदायक आसन : शीर्षासन केल्यामुळे आपल्या शारीरिक शक्तीमध्ये चांगली वाढ होते. सातत्य राखलं तर मनाजोगे ऍब्जपण घोटवून शरीराचं सौंदर्य वाढवता येतं. शरीर उलट्या स्थितीत ठेवलेलं असल्यामुळे आपल्या कंबरेचा खालचा भाग आणि मांड्यांची आतली बाजू चांगली दणकट होते.

हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त: शीर्षासन केल्याने आपली हाडं चांगली मजबूत होतात. यामुळे ओस्टियोपोरोसिस सारखे हाडांचे आजार दूर राहतात. म्हणूनच तरूण वयातच केलेल्या शीर्षासनाचा फायदा आपल्याला प्रौढावस्थेत होतो आणि ओस्टियोपोरोसिस सारखा वेदनादायक आजार दूर राहतो.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त: शीर्षासन नियमितपणे केल्यामुळे आपल्याला वजन घटवता येतं आणि लठ्ठपणा नियंत्रण ठेवता येतं. या आसनाच्या नियमित सरावामुळे पिट्यूटरी नावाच्या ग्रंथींवर चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे इतर अंतःस्रावी ग्रंथींमधून योग्य प्रमाणात हार्मोन्सचा स्राव करण्यात मदत होते. याशिवाय शीर्षासनामुळे थायरॉईड ग्रंथींवरही चांगला परिणाम होतो, पर्यायाने शरीराचा मेटाबॉलिजम बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहतो.

केसगळती थांबते : शीर्षासन नियमितपणे केलं तर केस गळण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येते. या आसनाच्या सरावाने मेंदूच्या भागात होणार रक्तपुरवठा चांगला सुधारतो.  आणि महत्त्वाचं म्हणजे आपली कवटी ह्या आसनामुळे मजबूत होते आणि तिचं आरोग्य सुधारते. परिणामी, केसांशी संबंधित सगळ्या समस्या, उदा. केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा होणे इ. पासून सुटका होते. केसांची लांबी वाढून केसांचा दाटपणाही या आसनामुळे वाढीला लागतो.

चेहऱ्याची चमक वाढवतो : शीर्षासन केल्याने चेहऱ्यावर चांगला छान तजेला येतो. चेह्ऱ्यातील नसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यामुळे चेहरा तजेलदार दिसायला सुरुवात होते. सगळी पोषक तत्वं आणि खनिजं, लवणप्रवाह सुधारल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमं, पिंपल्स, डाग, सुरकुत्या आणि बाकी तक्रारी आपोआपच दूर होतात आणि चेहरा आतून उजळतो.

मधुमेहात उपयुक्त: मधुमेहाला अटकाव करण्यात हे आसन महत्त्वाची भूमिका निभावते. पॅन्क्रियाला उत्तेजित करून इन्सुलिनचा स्राव व्यवस्थित करण्यात ह्या आसनाचा चांगला उपयोग होतो. एकूणच मधुमेहापासून लांब राहायचे असेल तर हे आसन करणे योग्य आहे.

मेंदूसाठी उपयोग: शीर्षासन केल्याने मेंदूला फार उत्तम व्यायाम मिळतो. मेंदूच्या आरोग्यासाठी हा एक चांगला योगाभ्यास आहे. मेंदूच्या करोडो कोशिकांमध्ये शीर्षासन केल्याने नवीन प्राण फुंकले जातात. ह्या कोशिकांना योग्य प्रमाणात रक्त आणि इतर पोषण द्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे त्यांच्यात तजेला येतो. आणि अशा प्रकारे मेंदूतील कोशिका आणि इतर ऊतींची चांगली निगा आपोआपच राखली जाते.

डोकेदुखी आणि अर्धशिशी (मायग्रेन) रोखण्यासाठी उपयुक्त: शीर्षासन दैनंदिन जगण्याचा भाग केल्यास डोकेदुखी आणि मायग्रेनच्या तक्रारीपासून कायमची सुटका मिळते. डोक्यातील पेशींच्या कोशिकांच्या नसांवर पडणारा दाब किंवा त्यांच्या संकुचनामुळे डोकेदुखीचा त्रास होत असतो. मात्र शीर्षासन नियमितपणे केल्यास ह्या त्रासाची अखेर हो्ते.

सेक्शुअल समस्यांचं समाधान: शीर्षासन केल्याने बहुतांश प्रमाणात सेक्ससंबंधित समस्या दूर होतात. समस्या दूर झाल्यामुळे सेक्सलाईफचा आनंद दुणावतो.

डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी: हे आसन केल्यामुळे डोळा आणि डोळ्याच्या आजूबाजूच्या भागात योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा होतो. नेमक्या ह्याच एका गोष्टीमुळे डोळ्यांच्या बराचश्या तक्रारी संपून जातात.

मूळव्याध आणि व्हेरिकोज व्हेन्सपासून मुक्ती: अतिशय वेदनादायी समजला जाणारा आजार म्हणजे मूळव्याध. तीच गोष्ट व्हेरिकोज व्हेन्स या आजाराची. खरं म्हणजे शरीराच्या त्या विशिष्ट भागात योग्य प्रमाणात रक्त पुरवठा न झाल्याने हे त्रास उद्भवलेले असतात. मात्र शीर्षासन नियमित केल्याने ह्या दोन्ही त्रासांपासून कायमची मुक्ती मिळते.

पचनक्रिया सुधारते : हे आसन रोज केल्याने पचन क्रियेवर चांगला परिणाम झालेला दिसून येतो. बद्धकोष्ठ, अजीर्ण आणि इतर तक्रारींपासून शीर्षासन नियमितपणे केल्याने सुटका मिळते.

शीर्षासन करण्यासाठीच्या सूचना
1. सर्वप्रथम गुडघ्यांवर येऊन वज्रासनात बसावं आणि आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांत इंटरलॉक करून ते आपल्या मॅटवर ठेवावेत.
2. हाताची बोटं इंटरलॉक केल्यानंतर तळव्यांना एका वाटीचा आकार द्यावा आणि सावकाशपणे आपलं डोकं झुकवून तळव्यांवर ठेवावं.
3. यानंतर सावकाश आपले दोन्ही पाय वर उचलावेत आणि एकदम सरळ ठेवावेत. पाय वर उचलण्य़ासाठी भिंत आणि दुसऱ्या कोणा व्यक्तीची मदत घेता येईल.
4. या दरम्यान खालपासून ते वरपर्यंतचं शरीर एकदम सरळ असलं पाहिजे. शरीराचा तोल नीट सांभाळावा.
5. ह्या स्थितीत आल्यानंतर १५ ते २० सेकंद दीर्घश्वसन करावं आणि आहे त्या स्थितीत तसंच राहावं.
6. आता सावकाशपणे श्वास सोडत पाय जमिनीवर अलगद आणावेत.
7. आसनाची हीच कृती तीन ते चार वेळा पुन्हा करावी.
8. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की शीर्षासनाचा सराव भल्या पहाटे अनशापोटी करावा. पोट अगदी स्वच्छ, रिकामं असणं आवश्यक आहे. तसं असेल तरच हे आसन व्यवस्थितपणे करता येईल.

शीर्षासन करताना घेण्याची काळजी
1. तुम्हाला उच्च रक्तदाब, हृदयविकार, मेंदूचे विकार किंवा कोरोनरी थ्रॉम्बोसिस एवं ग्लूकोमा ह्या तक्रारी असतील तर हे आसन अजिबात करू नये.
2. मेंदूमध्ये ब्लड हॅमरेज, किडनीचे विकार, स्लीप डिस्क अशा समस्या असतील तर हे आसन करू नये.
3. शरीर दमलेलं असेल, डोकं दुखत असेल किंवा पोट गच्च भरलेलं असेल तर त्या स्थितीत हे आसन करू नये.
4. शीर्षासनाच्या शेवटच्या टप्प्यात शरीर वरच तोलून सरळ, ताठ ठेवावं. पुढे किंवा मागे करत झुकवू नये. तसं केल्यास तोल गडबडेल आणि पडल्यामुळे जखम होण्याचीही शक्यता आहे.
5. तुमच्या शरीरात रक्तदोष असेल किंवा अशुद्ध रक्त असेल तर हे आसन करू नये. ते केल्यास मेंदूला अशुद्ध रक्ताचा पुरवठा होऊन विपरित परिस्थिती निर्माण होऊ शकते.
6. महिलांनी मासिक पाळी सुरू असताना तसंच गरोदर असताना हे आसन करू नये.
7. तुम्हाला चक्कर येऊन गरगरल्यासारखं होत असेल, डोक्याला दुखापत झाली असेल किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर शीर्षासन करू नये.
8. मानेचं काही दुखणं असेल, मानेला काही दुखापत झाली असेल तर हे आसन करू नये. याशिवाय हार्निया , हायपरटेंशन आणि लठ्ठपणाने त्रस्त लोकांनी हे आसन करू नये.

Share This News

Related Post

Bakasana

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 10, 2024 0
आशियामध्ये, बगळ्याला प्राचीन काळापासूनच समृद्धी आणि युवावस्थाचे प्रतीक मानले जाते. चीनमध्ये बगळे हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. बकासन/काकासनात या तिन्ही…
Pune News

President Droupadi Murmu : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted by - November 29, 2023 0
पुणे : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली…
protin Powder

मुलांसाठी घरीच तयार करा ‘हि’ प्रोटीन पावडर; आरोग्य चांगले राहण्यास होईल मदत

Posted by - May 6, 2023 0
पुणे: दूध म्हंटले कि लहान मुले नाक मुरडत असतात. त्यांना ते आवडत नसते. त्यामुळे पालक आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी अनेकदा हेल्थ…
Eye Irritation

Eye Irritation : डोळे येण्याची कारणे कोणती आहेत? त्यांची काळजी कशी घ्यायची ?

Posted by - August 13, 2023 0
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये डोळे येण्याच्या (Eye Irritation) प्रमाणात वाढ झाली आहे. ह्यामध्ये डोळ्यातील (Eye Irritation) पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *