Govinda

Govinda : गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

979 0

मुंबई : 90 च्या दशकातील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदा (Govinda) यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकीय इनिंग सुरु करणार असल्याचे बोललं जात होतं. अखेर अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश करत शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. गोविंदाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळू शकते. तर बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत गोविंदाचा पक्षप्रवेश पार पडला.

अभिनेता गोविंदाच्या पक्षप्रवेशानंतर तो उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गजानन किर्तीकर यांचं वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, याच पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता महायुतीकडूनही या जागेवर चर्चेतील चेहरा देण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी अभिनेता गोविंदा यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे. याआधीही 2004 मध्ये गोविंदाने काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्याने भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : RR Vs DC मध्ये कोणाचे पारडे आहे जड?

SBI चा ग्राहकांना मोठा झटका! डेबिट कार्ड संदर्भातील ‘हा’ नियम 1 एप्रिलपासून होणार लागू

Shivsena : अखेर एकनाथ शिंदेंच्या 11 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Posted by - March 18, 2022 0
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे.…
Ajit Pawar

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश; अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - January 27, 2024 0
सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आज यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत…
Raksha Khadse

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : रावेर मधून रक्षा खडसे विजयी

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर…

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो…. संभाजीराजेंचं ट्विट

Posted by - May 29, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष…
Ajit Pawar

अजित पवारांनादेखील भाजपमध्ये यायचं होतं’; ‘या’ आमदाराचा दावा

Posted by - May 14, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *