IPL 2024

IPL 2024 : RR Vs DC मध्ये कोणाचे पारडे आहे जड?

727 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या 17 व्या सिझनला (IPL 2024) सुरुवात झाली आहे.आज 9 वा सामना खेळवण्यात येणार असून हा सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.

दोन्ही संघांची कामगिरी पाहिली तर राजस्थान रॉयल्सने त्यांच्या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे.दिल्ली कॅपिटल्सला अजूनही विजय मिळवता आलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्स पहिल्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स आठव्या स्थानावर आहे. आज दोन्ही टीम आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार असून टीम्सची संभाव्य प्लेईंग 11 आणि हेड टू हेड जाऊन घेऊया.

कशी आहे हेड-टू-हेड आकडेवारी
दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील दोन्ही टीम्सच्या हेड टू हेड आकडेवारी संदर्भात चर्चा केली तर राजस्थान रॉयल्सने अधिक सामने पटकावलेले आहेत. आतापर्यंत दोन्ही टीम्सने एकूण 27 आयपीएल सामने खेळले आहेत. त्या मध्ये राजस्थान रॉयल्सने 14 सामने जिंकले तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही टीम्समध्ये नेहमीच चुरशीची स्पर्धा दिसून येत असून आजच्या सामन्यात कोण जिंकणार ह्यावर क्रिकेट चाहत्यानाचे लक्ष आहे.

पिच रिपोर्ट काय आहे?
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानण्यात येते. या खेळपट्टीवर आतापर्यंत एकूण दोन आयपीएल सामने खेळण्यात आले असून या खेळपट्टीवर नेहमी फलंदाजाचे वर्चस्व पाहायला मिळते. त्यामुळे या पिचवर फलंदाजांना रन्स मिळवण्यात जास्त यश मिळेल.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल/नांद्रे बर्जर, आर अश्विन, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग 11
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अभिषेक पोरेल, रिकी भुई, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार/कुमार कुशाग्रा, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

SBI चा ग्राहकांना मोठा झटका! डेबिट कार्ड संदर्भातील ‘हा’ नियम 1 एप्रिलपासून होणार लागू

Shivsena : अखेर एकनाथ शिंदेंच्या 11 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

T-20 WorldCup 2024

T-20 WorldCup 2024 : हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून ‘या’ खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा; ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात

Posted by - January 15, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका (T-20 WorldCup 2024) खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत…
Rishabh Pant

Rishabh Pant : ऋषभ पंतचा जलवा कायम ! न खेळताही रोहित अन् विराटला टाकले मागे

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. मागच्या वर्षी 30 डिसेंबर रोजी…
Rohit Sharma

ICC Ranking : आयसीसी ODI क्रमवारीत रोहित शर्माने घेतली मोठी झेप; बाबर आझमचे स्थान धोक्यात?

Posted by - October 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सुरु असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ICC Ranking) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या…
Team India

IND vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची कशी असेल प्लेईंग 11?

Posted by - October 19, 2023 0
पुणे : आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 17 वी मॅच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये (IND vs BAN) गुरुवारी,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *