Delhi Crime Video

Delhi Crime Video : दिल्ली हादरली ! भरदिवसा माथेफिरूने तरुणीवर केले चाकूने सपासप वार

692 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना (Delhi Crime Video) समोर आली आहे. यामध्ये एका माथेफिरू तरुणाने एका तरुणीवर चाकूने सपासप वार केले आहेत. दिल्लीच्या मुखर्जी नगर भागात ही घटना घडली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमन नावाचा तरुण मुखर्जी नगर परिसरात फिरत असायचा. त्या परिसरातील विद्यार्थी अमनला वेडा म्हणत त्याची खिल्ली उडवायचे. ज्या मुलीवर अमनने हल्ला केला ती परिसरात असणाऱ्या लायब्ररीत अभ्यासाला येत होती. आरोपीने असा दावा केला की, मुलीनेही त्याची खिल्ली उडवली. त्यामुळे रागाच्या भरात भाजीवाल्याचा चाकू उचलून त्याने तिच्यावर हल्ला केला.

अमनने केलेल्या हल्ल्यात तरुणीला सुदैवाने गंभीर जखम झाली नाही. अशा प्रकारच्या हल्ल्यात बऱ्याचदा आजूबाजूचे लोक घाबरून पळून जातात. पण मुखर्जीनगरमध्ये तरुण हल्ला करत असताना इतरांनी त्याला वेळीच अडवल्याने पुढचा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : ‘त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडं…’; शरद पवारांच्या भेटीनंतर धंगेकरांची मोहोळांवर टीका

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

महिलाच नाहीत तर मुकी जनावरं देखील असुरक्षित; कुत्र्यासोबत विकृताचे असे कृत्य; सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

Posted by - March 22, 2023 0
पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणामधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका भटक्या कुत्र्यावर एका तरुणाने बलात्कार…
nagpur crime

Nagpur Crime : जुना वाद मिटवण्यासाठी गेला आणि जीवानिशी मुकला

Posted by - August 29, 2023 0
नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत (Nagpur Crime) येणाऱ्या डोंगरगाव परिसरात 17 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.…
Women Fight Video

Women Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये रंगली ‘दंगल’ तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

Posted by - December 31, 2023 0
सार्वजानिक ठिकाणी होणाऱ्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ (Women Fight Video) तुम्ही पाहिले असतील. कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी मेट्रोमध्ये, अनेकदा कशाचीही…

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Posted by - January 15, 2024 0
नवी मुंबई : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ (Suicide) उडाली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *