Manoj Jarange

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

319 0

जालना : आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?
‘अपेक्षित नसलेल्या गोष्टी झाल्या की समाज एकवटतो, मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आम्ही टिकणाऱ्या आरक्षणाच्या बाजूनं आहोत. मी माझ्या समाजाच्या हिताचं बोलत आहे. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला समाजासाठी काम करायचं आहे. या बैठकीला आणखीही मराठे येणार आहेत. समाजाला विचारून समाजाच्या हिताचा निर्णय घेणार आहे. आचारसंहितेच्या अगोदर का नाही आरक्षणाबाबत निर्णय घेतला?’ असा सवाल जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

जरांगेनी दिला इशारा
‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, कोणत्याही बदनामीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. मरेपर्यंत मी समाजाच्या बाजूनं उभं राहणार. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू आहे. आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. आणखी दहा पंधरा गुन्हे दाखल करणार आणि मला ते राज्यातून तडीपार करणार आहेत. तरीही मी समाजाशी नातं तुटू देणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही,’ असा इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Dhananjay Munde

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Posted by - February 15, 2024 0
बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या जमीन गैव्यवहार प्रकरणी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना…

पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Posted by - May 31, 2022 0
पुणे- पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात…

मंत्रिमंडळ निर्णय : पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट ; बैठकीतील निर्णय सविस्तर

Posted by - September 27, 2022 0
फोर्टिफाईड तांदूळ राज्यात वितरीत करणार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ (पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरीत…
NCP

NCP : …तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

Posted by - February 19, 2024 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, यानंतर शरद पवार गटाला…

“आपल्या जन्मदात्या ‘आईची’ आणि ‘बायकोची’ ‘बहिणीची’ आठवण असू द्या…! महिलांची माफी मागा…! ” गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून विद्या चव्हाण संतापल्या…

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : गुलाबराव पाटील यांच्यावर विद्या चव्हाण यांनी संतप्त टीका केली आहे . यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *