कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त

2876 0

कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त

गेल्या काही दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे शहर आणि जवळपासच्या भागात अनेक दहशतवाद विरोधी कारवाया केलेल्या आहेत. यातच आता एनआयए ने दहशतवाद्यी कारवायांसाठी वापर करण्यात आलेली इमारत आणि इतर तीन मालमत्ता एनआयए ने जप्त केल्या आहेत. याच परिसरात दहशतवादी वास्तव्यास होते यादरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देखील घेतले असल्याचे तपासात समोर झाले आहे. हे दहशतवादी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होते, असे तपासात उघड झाले आहे.

दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ अमीर अब्दुल हमिद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल सलीम खान, कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी, जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन यांना अटक केली. हे सर्व दहशतवादी कोंडव्यात राहून दहशतवादी कारवाया करण्यासाठीचे प्रशिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मधील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचे षडयंत्र दहशतवाद्यांनी रचले होते हे तपासात उघड झाले आहे. या दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका कपड्याच्या दुकानात दरोडा टाकून बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते. तसेच साताऱ्यातील जंगल सदृश्य भागात या बॉम्बस्फोटांसाठीचे प्रात्यक्षिक केल्याचेही समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास एनआयए करत आहे.

Share This News

Related Post

महाबळेश्वर जवळील घाटात 40 मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला

Posted by - January 14, 2023 0
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीकच्या घाटात मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोला अपघात झालाय. आज सकाळी 8 च्या सुमारास हा अपघात झाला.…

तीन मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यावर पुण्यात पाचशे कोटीचा; प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Posted by - October 31, 2022 0
पुणे : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Pune News

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Posted by - March 15, 2024 0
कुरुंदवाड : पुणे येथील इंद्रायणी बालन फांऊंडेशन व पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत स्पेशल कमांडो सुरक्षा…

छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापूरचा सुपुत्र रामेश्वर काकडेंना वीरमरण

Posted by - March 17, 2022 0
सोलापूर – छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना बीएसएफमध्ये कार्यरत असलेले सोलापूरचे जवान रामेश्वर काकडे शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी त्यांना गोळी…

शाळेत मोबाईल घेऊन जाण्यास आईने दिला नकार ; मुलाने उचलले थेट असे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Posted by - December 15, 2022 0
खरगोण : मध्य प्रदेश मधील खरगोण येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खरगोण येथे एका नववित शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रेल्वे समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *