कात्रज कोंढवा रस्त्यासाठी 140 कोटींचा निधी; रस्त्याच्या कामाला गती महानगरपालिकेवर अतिरिक्त खर्चाचा भार

2804 0

पुणे: कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाची घोषणा अनेक दिवसांपूर्वी झाली होती. मात्र या कामासाठी भूसंपादनासाठी अनेक अडथळे निर्माण होत होते. मात्र आता कुठेतरी या कामाला गती येण्याची चिन्ह दिसत आहेत. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी वर्षभराच्या कालावधीनंतर एकूण खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 139.83 कोटी रुपये निधी देण्याचा आदेश देण्यात आला.

 

या रस्त्याच्या कामाची पाहणी अनेक मोठ्या नेत्यांनी केली होती. त्याचबरोबर रस्त्याच्या कामासाठी 200 कोटी रुपये राज्य सरकारने द्यावेत अशी मागणी महानगरपालिकेतर्फे करण्यात आली होती. त्यावर पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यमान पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या रस्त्याच्या कामासाठी 200 कोटी रुपये देऊ असे सांगितले होते. मात्र हा निधी अद्यापही देण्यात आला नव्हता पण अखेर शुक्रवारी या संदर्भातला आदेश काढण्यात आला. यानुसार या कामासाठी 139.83 कोटी रुपये महापालिकेला वर्ग केले जाणार आहेत. पण एकूण 200 कोटी निधीतील केवळ 139.83 कोटीचा निधी दिला जाणार असल्यामुळे उर्वरित साठ कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला द्यावे लागतील. त्यामुळे या अतिरिक्त साठ कोटींचा भार पुणे महानगरपालिकेवर पडणार आहे.

 

कात्रज कोंढवा भागात वाढलेल्या लोकसंख्येमुळे या भागात वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात होते. ज्यावर उपाय म्हणून या रस्त्याचे 84 मीटर रुंदीकरणाचे काम करण्याचा महानगरपालिकेचा विचार होता. मात्र या कामात भूसंपादन करण्यासाठी अनेक अडथळे आल्याने या रस्त्याचे रुंदीकरण 50 मीटर पर्यंत कमी केले गेले. मात्र यानंतरही अनेक जागा मालकांनी भूसंपादनाच्या बदल्यात मिळणारा मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात द्यावा अशा प्रकारची मागणी केल्यामुळे हे काम अनेक वर्ष रखडले होते. मात्र निधी अभावी रखडलेले हे काम येत काही दिवसात सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल असे स्थानिकांचे आणि महानगरपालिका प्रशासनाचे मत आहे.

Share This News

Related Post

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा; सिसोदिया म्हणाले…..

Posted by - August 19, 2022 0
नवी दिल्ली: सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित 21 ठिकाणी छापेमारी केली…
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने (Maharashtra Rain) झोडपले आहे.…

महिला ST कंडक्टरचे गणवेशातील रिल्समुळे निलंबन योग्य की अयोग्य ?

Posted by - October 4, 2022 0
आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक यांच्या माध्यमातून अनेक कलाकार रिल्स बनवून त्या पोस्ट करत असतात. त्यापैकी अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड…
Dhananjay Munde

Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

Posted by - December 24, 2023 0
पुणे : राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या तक्रारीमुळे ते रूग्णालयात गेले हाेते. तेथे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लखनौमध्ये जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला बुलेटप्रूफ कार

Posted by - April 8, 2023 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह विशेष अयोध्या दौरा करत आहेत. या दौऱ्याची खूप चर्चा आहे. आज मुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *