Paytm Payments Bank

Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत

227 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm Payments Bank Ltd (PPBL) वर लादलेल्या निर्बंधांमुळे 15 मार्च 2024 नंतर अनेक Paytm सेवा काम करणे बंद करणार आहेत. रेग्युलेटरी नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने जानेवारीच्या अखेरीस पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली होती. ज्यामुळे PBBL ला 29 फेब्रुवारी 2024 नंतर नवीन ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र, ही मुदत नंतर 15 दिवसांनी वाढवून 15 मार्च 2024 करण्यात आली होती. चला तर मग कोणत्या सेवा राहणार सुरु आणि कोणत्या सेवा राहणार बंद याबाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया….

15 मार्चनंतर या 8 सेवा बंद होतील
1. फास्टॅगचा वापरही बंद होणार आहे. जोपर्यंत शिल्लक रक्कम आहे तोपर्यंत वापरकर्त्यांना पेटीएम फास्टॅग वापरण्याचा पर्याय मिळेल. यानंतर, वापरकर्त्याला फास्टॅगमध्ये पैसे भरण्याचा पर्याय मिळणार नाही.

2. पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्त्यांसाठी वॉलेट सेवा बंद केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना त्यांच्या वॉलेटचे पैसे इतर कोणत्याही बँक खात्यात हस्तांतरित करण्याची सुविधा मिळेल.

3. पेटीएम पेमेंट्स बँकिंग सेवेअंतर्गत, वापरकर्ते UPI किंवा IMPS द्वारे पैसे काढू शकतील, परंतु 15 मार्च नंतर, तुम्हाला दुसऱ्या बँकेतून व्यवहार करावे लागतील. याशिवाय, इतर सेवा आहेत ज्या पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्ते घेऊ शकणार नाहीत.

4. बँक खात्यासाठी टॉप-अप सेवा

5. पेटीएम बँकेत दुसऱ्या बँक खात्यातून पैसे मिळणे

6. डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर

7. पगार ट्रांसफर करणे

8. पेटीएम फास्टॅग बॅलन्स इतर फास्टॅगवर ट्रान्सफर करण्याची सुविधा

‘या’ सेवा पेटीएमवर 15 मार्चनंतरही सुरू राहतील
पैसे काढणे- तुम्ही पेटीएम पेमेंट बँक खात्यातील सध्याचे पैसे काढू शकाल.

वॉलेट मनी- पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्ते वॉलेटमधील पैसे देखील काढू शकतील.

कॅशबॅक- कॅशबॅक रक्कम वापरकर्त्यांच्या खात्यात राहील.

रिफंड- रिफंड पैसे देखील बँक खात्यात असतील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग

Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये 5G सेवेचे अनावरण

Posted by - October 1, 2022 0
नवी दिल्ली : इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) मध्ये 5G ची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर बटण…
Phone Pe

फोन पे पेमेंट अ‍ॅपनं लॉन्च केली एग्रीगेटर सर्व्हिस; जाणून घ्या काय आहे सर्व्हिस आणि त्याचे फायदे

Posted by - June 8, 2023 0
फोन पे पेमेंट अ‍ॅपने काही दिवसांपूर्वी अकाउंट एग्रीगेटर सेवा सुरू केली आहे. फोन पे कंपनीने त्यांची सहकारी कंपनी PhonePe Technology…

#CREDIT CARD : क्रेडिट कार्डवर चारचाकी खरेदी करताय ? थांबा ही माहिती वाचा

Posted by - March 21, 2023 0
अर्थकारण : क्रेडिट कार्डमुळे खिशात पैसा बाळगण्याची गरज राहिलेली नाही. काहींची मर्यांदा लाखांच्या घरात असल्याने बरीच मंडळी क्रडिट कार्डवरून व्यवहार…

अर्थकारण : खासगी नोकरीत पेन्शनची सुविधा नाही… ? स्मार्ट पद्धतीने गुंंतवणूक करून पेन्शनसारखी सुविधा मिळावा

Posted by - July 28, 2022 0
अर्थकारण : एखाद्या सरकारी खात्यात किंवा खासगी क्षेत्रातील कंपन्यांत कर्मचार्‍यांना पेन्शनची सुविधा नसेल किंवा एखाद्या कर्मचार्‍याने पेन्शन योजनेत गुंतवणूक केलेली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *