शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला पूर्वनियोजित;जितेंद्र आव्हाडांचा दावा

377 0

शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नसल्याचही आव्हाड म्हणाले. परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला. हा हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता. त्यांनी साहेबांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती. महाराष्ट्राचे नशीब की असं काही घडले नाही.असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांनंतर राष्ट्रवादी पक्ष आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, मात्र, चुकीच्या नेतृत्त्वाखाली पाठीशी नाही असं शरद पवार यांनी म्हटले आहे. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल असंदेखील पवार यांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांकडून जल्लोष साजरा केला गेला असला त्याच्या दुसऱ्याच दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला केला होता. हातात दगड आणि चपल्ला भिरकावत त्यांनी पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर कूच केली होती. या हल्ल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि मग त्यानंतर कारवाई करण्यात आली. एसटी संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही सध्या अटक करण्यात आली आहे. एसटी संपकऱ्यांना चिथावणी कुणी दिली आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे तपासण्याचं काम सध्या सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

 

 

 

Share This News

Related Post

महत्वाची बातमी, किरीट सोमय्या यांच्यानंतर नील सोमय्या यांना हायकोर्टाचा दिलासा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई- किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना देखील हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी कथित घोटाळाप्रकरणी तूर्तास…
election-voting

Loksabha Election : महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77% मतदान

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान…
Buldhana News

Buldhana News : ‘या’ भाजप नेत्याच्या मुलाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 11, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Buldhana News) एका युवा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू…

पुणेकरांनो सावधान : पनीर कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची तिसरी मोठी कारवाई ; २२ लाखाचा साठा जप्त

Posted by - September 13, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर…

“मराठी शाळा वाचल्याच पाहिजे !” पुण्यात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने चिकटवले पोस्टर

Posted by - October 10, 2022 0
पुणे : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 100 एस.टी बसेसला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *