प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच प्रशासक घेणार पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा

239 0

पुणे महापालिकेत प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच सोमवारी महापालिकेची एप्रिल महिन्याची मुख्यसभा होणार आहे. स्थायी समिती, शहर सुधारणा समितीमधून आलेल्या प्रस्तावांवर मंजुरी दिली जाईल.ही मुख्यसभा महापालिकेच्या सभागृहात नसून आयुक्तांच्या कार्यालयातच होणार आहे.सोमवारी दुपारी तीन वाजता महापालिकेची मुख्यसभा होत आहे.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत १४ मार्च रोजी संपली. १५ मार्च पासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून कामावर रुजू झाले. या दरम्यान त्यांनी दोन स्थायी समितीच्या बैठका घेतल्या. शहर सुधारणा समितीची बैठक घेऊन प्रस्ताव मंजूर केले. प्रशासक राज येण्याआधी महापालिकेच्या मुख्यसभा सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही सभा भरत असायची. त्यात नगरसेवक त्यांचेच मुद्दे मांडतात, प्रशासनाकडून त्यावर खुलासा केला जातो. अनेकदा आंदोलनही केले जाते. तर नगरसचिवांकडून महापालिका कामकाज नियमावलीनुसार मुख्यसभा चालवत असतात.मात्र सोमवारी होणाऱ्या मुख्यसभेत हे चित्र पाहायला मिळणार नाही. ही सभा नागरिकांसाठी खुली असणार नाही. महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात प्रशासक म्हणून विक्रम कुमार, नगरसचिव शिवाजी दौंडकर व इतर अधिकारी यावेळी उपस्थित असतील. नगरसचिव विभागाने मुख्यसभेची कार्यपत्रिका तयार केली आहे. त्यानुसार प्रस्ताव घेऊन त्यास मंजुरी दिली जाईल.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

Posted by - July 2, 2023 0
मुंबई- आज सकाळपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती. अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराची…

गंगाधाम चौक येथील आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची बिहार स्टाईल गुंडगिरी – प्रशांत जगताप

Posted by - September 3, 2022 0
पुणे : गंगाधाम चौक येथे आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपचे आमदार व नगरसेवकांनी धाक – दडपशाही केल्याचा प्रसंग दोन दिवसांपासून…

पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटींचं अंदाजपत्रक सादर

Posted by - March 7, 2022 0
पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटीचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलं. यावेळी अंदाजपत्रकात पुणे शहरात नव्याने सहा उड्डाणपूल होणार…
Nashik News

Nashik News : ‘समृद्धी’नंतर आता नाशिकमध्ये मोठा अपघात, ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक

Posted by - October 15, 2023 0
नाशिक : आज सकाळच्या सुमारास समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Nashik News) झाला. ही घटना ताजी असताना आता पुन्हा मोठ्या अपघाताची…
Maratha Reservation

Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य

Posted by - February 10, 2024 0
परभणी : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढला असून, याच अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *