महापारेषणकडून टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम ; सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

309 0

महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्च दाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या परिसरामध्ये सोमवारी (ता. ११) पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. उन्हाच्या झळा तसेच दैनंदिन कामांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटेच्या सुमारास महापारेषणकडून दोन तासात हे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर अतिउच्च दाब उपकेंद्रादरम्यान टॉवर लाईनचे जम्प बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम तातडीचे व अत्यावश्यक असल्याने पूर्वनियोजन करून सोमवारी (ता. ११) पहाटे दोन तासांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे खराडी अतिउच्च दाब उपकेंद्रातून होणाऱ्या महावितरणच्या २२ केव्ही १९ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून १९ पैकी ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा महापारेषणच्या मगरपट्टा, थेऊर, व्हीएसएनएल या अतिउच्च दाब उपकेंद्राद्वारे पर्यायी स्वरुपात सुरु ठेवण्यात येणार आहे. तथापि विजेचे भार व्यवस्थापन शक्य होत नसल्याने उर्वरित ८ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पहाटे दोन तास नाईलाजाने बंद ठेवावा लागणार आहे.

त्यामुळे सोमवारी (ता. ११) पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान या ८ वीजवाहिन्यांवरील गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, पीडब्लूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पीटल परिसर, विमानगर, रोहन मिथीला सोसायटी, साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, संघर्ष चौक, प्रितनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाऊसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे. या परिसरातील वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर या संदर्भात ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येत आहे.

Share This News

Related Post

राज्यातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

Posted by - April 20, 2022 0
राज्यातील 11 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 11 पोलीस उपायुक्त , पोलीस अधीक्षक यांची पोलीस उप…
Pune Crime

Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या

Posted by - April 8, 2024 0
पुणे: पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी लातूरहुन पुण्यात आलेल्या एका तरुणीची तिच्याच…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : चांद्रयान -3 बरोबर इस्त्रो आणखी ‘या’ 5 मोहिमांवर करत आहे काम

Posted by - July 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 3 ची (Chandrayaan-3) रंगीत तालीम इस्त्रोने यशस्वी केली आहे. आता केवळ…
Ashish Bharti

Ashish Bharti : पुणे महानरपालिकेचे माजी आरोग्य प्रमुख आशिष भारती यांना सत्र न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - November 30, 2023 0
पुणे : पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Ashish Bharti), मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश…

अखेर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

Posted by - May 9, 2022 0
श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट आणि निदर्शने सुरु असतानाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *