Dolly Sohi

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

792 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज महिला दिन मात्र या दिवशी बॉलिवूड विश्वातून एक दुःखद बातमी (Dolly Sohi) समोर आली आहे. कलश, हिटलर दीदी, देवों के देव महादेव यासह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन झालं. तिला सर्वायकल कॅन्सरचं निदान झालं होतं. तिने वयाच्या 48 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डॉली सोहीची बहीण अमनदीप सोही हिचासुद्धा 48 तासांपूर्वी मृत्यू झाला होता. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

डॉली सोहीच्या निधनाची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. डॉलीचा भाऊ मनु याने सांगितलं की, डॉलीचं सकाळी निधन झालं. यामुळे आमच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तिच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अमनदीप सोहीसुद्धा टीव्ही अभिनेत्री होती. दोन दिवसात दोन्ही बहिणींच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डॉली सोहीची प्रकृती खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला सर्वायकल कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

अभिनेत्री ईशा अग्रवालची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; झोलझाल चित्रपटाची घोषणा

Posted by - June 13, 2022 0
मराठी सिनेसृष्टीत आता तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री ईशा अग्रवाल झळकणार आहे. आगामी मराठी चित्रपट ‘झोलझाल’ मध्ये अभिनेत्री…

#PRIYANKA CHOPRA JONAS : प्रियांका चोप्राच्या हॉलिवूड स्पाय वेब सीरिज ‘#CITADEL’ चा ट्रेलर रिलीज

Posted by - March 7, 2023 0
प्रियांका चोप्रा जोनासच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होण्यासाठी तयार असलेली ही स्पाय सीरिज…
Patthe Bapurao

Patthe Bapurao : लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर सिनेमा येणार; ‘हे’ कलाकार साकारणार मुख्य भूमिका

Posted by - October 15, 2023 0
मुबई : आजकाल सगळीकडे बायोपिक काढण्याचा नवा ट्रेंडच सुरु झाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांच्या आयु्ष्यावर चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत.…

केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत

Posted by - October 23, 2022 0
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’ चा सध्या 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी त्यांच्या त्याच्या पायाची…

गाडीच्या नंबरप्लेटवरील मजेशीर मजकूर वाचून उत्तरप्रदेश पोलिसांनी केलं “असं” ; जे वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Posted by - March 19, 2022 0
मुंबई पोलीस फिल्मी गाणी आणि सीनच्या माध्यमातून अनेकदा लोकांना संदेश देत असतात. अशात उत्तर प्रदेश पोलीसही आता यात मागे नाहीत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *