Satara News

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

565 0

सातारा : पिंपोडे बुद्रुक (Satara News) येथील खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला 15 दिवसांनी यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशांत संजय साळुंखे याला अटक केली आहे. भगवान हा सुशांतला अनैतिक कृत्य करायला प्रवृत्त करून छेड काढत होता त्यामुळे त्याने खून केल्याचे कबूल केले आहे.

काय घडले होते नेमके?
वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पिंपोडे बुद्रुक मागील पंधरा दिवसांपूर्वी सुतारकी नावाच्या शिवारामध्ये शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या भगवान मच्छिंद्र सपकाळ ( वय 24 रा. पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगांव) मयत भगवान हा गरीब कुटुंबातील असून अज्ञात संशयितांने त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर खलबत्ताच्या ठोंब्याने घाव घालून खून करण्यात आला होता. सदर खुनाचा गुन्हा आई सौ.लक्षमी सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन वाठार पोलीस ठाण्यात दाखल होता. भगवान हा खाजगी दवाखान्यात मदनीस म्हणून काम करायचा तर आई वडील शेती आणि मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत असत. सदर गुन्हा घडल्यापासून वाठार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना तपासकामी तारेवरची कसरत करावी लागली. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

 

गुन्ह्यांच्या अनुषंगाने 10 दहा दिवस साध्या वेशात सदर परिसरांत गुप्तवाच ठेवून अखेर पोलिसांना एक साक्षीदार मिळाला, त्या साक्षीदाराने मयत इसमांस तसेच गावातील एका इसमांच्या घटनास्थळाकडे जाताना पाहिले असल्याची सांगितले तपासी पथकांने प्राप्त माहितीच्या अनुषंगाने इसमाचा शोध अखेर घेतला. परंतु तो इसम गावात नसल्याचे आढळून आले, अखेर संशयित आरोपी हा सातारा शहरांतील पिलेश्वरीनगर परिसरांत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. सदर त्या इसमाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता. त्याने सदरचा गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांना सांगितले अखेर जवळपास १७ दिवसांनी झालेल्या खोण्याचा गुन्हा कोणताही पुरावा तसेच धागेद्वारे नसताना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सुशांत संजय साळुंखे (वय 22 वय रा. पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगांव) असे या आरोपींचे नाव आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर स.पो.नि.सुधीर पाटील स.पो.नि.अशोकरावहुलगे स.पो.नि. आशिष कांबळे पो.उनि. नितीन भोसले पो.उनि. विश्वांस शिंगाडे अमित पाटील गणेश इथापे प्रदीप देशमुख प्रशांत गोरे नितीन पवार सहदेव तुपे अविनाश चव्हाण स्वप्निल कुंभार अमित माने हसन तडवी इम्रान मुलाणी प्रशांत गोरे नितीन पवार आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांच्या या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांकडूंन विशेष कौतुक होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Related Post

Kolhapur News

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Posted by - January 17, 2024 0
कोल्हापूर: कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला…

पुरामुळे निफाड सिन्नर रस्ता वाहतुकीसाठी बंद! नदीचा पुल पाण्याखाली

Posted by - July 14, 2022 0
नाशिक: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.…

महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन : महिला आयोग-फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ

Posted by - January 24, 2023 0
     मा.मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा…

BJP State President Chandrakantada Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा…!

Posted by - July 23, 2022 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *