Ranji Trophy

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

438 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी रणजी स्पर्धेत (Ranji Trophy) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुबईकडून खेळणाऱ्या या गोलंदाजांनी फलंदाजीमध्ये मोठं योगदान दिले आहे. दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना या दोघांनी शतकं ठोकली आहे. रणजी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडली आहे. मराठमोळ्या तुषार आणि तनुष यांनी अकराव्या क्रमांकावर 232 धावांची भागिदारी करून मोठा इतिहास रचला आहे.

तुषार देशपांडे यानं 129 चेंडूचा सामना करताना शतक ठोकले. यामध्ये 10 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश आहे. तुषार देशपांडे याने 123 धावांची विक्रमी खेळी केली. त्याशिवाय दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तनुष कोटियन यानं 129 चेंडूमध्ये दहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 120 धावा चोपल्या. याआधी 1946 मध्ये दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाच्या खेळाडूंनी शतक ठोकले होते. चंजू सरवटे आणि सूट बॅनर्जी यांनी अनुक्रमे 124 आणि 121 धावांची खेळी करत इतिहास रचला होता. त्यानंतर आता 78 वर्षानंतर हा विक्रम तुषार देशपांडे आणि तनुष कोटियन यांनी मोडीत काढला आहे.

कोण आहेत तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे ?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तनुष मुंबईकडून खेळतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तनुष यानं आतापर्यंत 10 अर्धशतकं ठोकली आहे, पण त्याचं हे पहिलंच शतक आहे. तनुष यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 38 च्या सरासरीने 915 धावा चोपल्या आहेत. दुसरीकडे तुषार देशपांडेही मुंबईचा सदस्य आहे. तर आयपीएलमध्ये तो चेन्नईच्या संघाचा सदस्य आहे. 2022 मध्ये तुषारला चेन्नईने 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Related Post

Bajarang Punia

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Posted by - May 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेकडून (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल…
Team India Jersey

Team India Jersey : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय; टीम इंडियाच्या जर्सीत बदल

Posted by - September 10, 2023 0
आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अशातच या सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक मोठा…

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण पदकं

Posted by - June 12, 2022 0
टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात…
jofra archer

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर; तर ‘या’ खेळाडूची झाली एंट्री

Posted by - May 9, 2023 0
मुंबई : यंदाच्या आय़पीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)आपल्या फॉर्मला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे कर्णधार रोहित शर्माचा (Rohit…
Ankit Bawne

Ankit Bawne : क्रिकेटर अंकित बावणेचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी सहकार्य करार

Posted by - August 5, 2023 0
पुणे : महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज अंकित बावणे (Ankit Bawne) आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी जोडला गेला आहे. या दोघांमध्ये नुकताच सहकार्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *