WPL 2024

WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास

437 0

मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या (WPL 2024) सीझनला शुक्रवार 23 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. या सीझनचा दुसरा सामना हा बंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सवर 2 धावांनी विजय मिळवून नव्या सिझनमध्ये विजयी सुरुवात केली. या सामन्यात आरसीबीची गोलंदाज शोभना आशा हिने आरसीबीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

या सामन्याच्या सुरुवातीला यूपी वॉरियर्सच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने मेघना आणि रिचा घोषच्या अर्धशतकाच्या जोरावर 6 विकेट्स गमावून 157 धावा केल्या. यूपी वॉरियर्सच्या फलंदाज विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आल्या परंतु आरसीबीच्या भेदक गोलंदाजी समोर फार काळ टिकू शकल्या नाहीत. आरसीबीची गोलंदाज शोभना आशाने यूपीच्या तब्बल 5 विकेट्स घेतल्या. तिच्या या कामगिरीच्या जोरावर आरसीबीने यूपी वॉरियर्सवर थरारक विजय मिळवला. या कामगिरीसह शोभना महिला प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात 5 विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे.

कोण आहे शोभना आशा?
शोभना आशा हिचा जन्म 1 जानेवारी 1991 रोजी झाला असून ती 32 वर्षांची आहे. शोभना ही बॉलिंग ऑलराउंडर असून तिचा जन्म हा केरळच्या त्रिवेंद्रममध्ये झाला होता. ती उजव्या हाताची फलंदाज असून लेगब्रेक गुगली गोलंदाजी ही तिची खासीयत आहे. शोभना यापूर्वी इंडिया ए वुमन, इंडियन बोर्ड प्रेसीडेंट वुमन इलेवन, केरल आणि पुडुचेरीच्या रेल्वे टीमकडून खेळली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तिला 10 लाख रुपयांना विकत घेऊन आपल्या संघात सामील केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

Maharashtra Weather Update

Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : आज हवामान विभागाकडून पावसाची आणि गारपिटीची शक्यता (Weather Update) वर्तवण्यात आली आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला…
IND Vs AUS

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : सध्या भारतात आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा सुरु आहे. या वर्ल्डकपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) 5 सामन्याची…
Ajit Pawar

Ajit Pawar : राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Posted by - June 10, 2024 0
मुंबई : राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान…
Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Expressway : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी 2 तासांचा ब्लॉक

Posted by - October 9, 2023 0
मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai – Pune Expressway) पुणे वाहिनीवर कि.मी. 45/000 अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी…
Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Highway : पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक आज दुपारी होणार बंद ; काय आहे नेमके कारण?

Posted by - July 24, 2023 0
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai – Pune Highway) आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *