Nashik Crime

Nashik Crime : नाशिकमध्ये डॅाक्टरवर कोयत्याने केले वार; मन विचलित करणारा Video समोर

723 0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून (Nashik Crime) एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका रुग्णालयात डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये हल्लेखोराने डॉक्टरवर तब्बल 19 वार केले आहेत. मन विचलित करणारं असं हे दृश्य आहे. नाशिकच्या पंचवटीतील सुयश हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
कैलास राठी असं या डॉक्टरचं नाव आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता डॉक्टर खुर्चीवर बसले आहेत. समोर एक व्यक्ती उभी आहे. या व्यक्तीने मागे हातात कोयता धरला आहे. डॉक्टर फोनवर बोलण्यात व्यस्त आहेत. हीच संधी साधत व्यक्ती कोयता काढतो आणि डॉक्टरवर सपासप वार करत जातो. सुरुवातीला तो मानेवर वार करतो. त्यानंतर गळ्यावर वार करतो. असं करत सपासप 19 वार तो करतो आणि नंतर तिथून निघून जातो.

हा व्हिडिओ तुमचे मन विचलित करू शकतो.👇👇👇 

https://twitter.com/viralmedia70/status/1761318017638477969

एवढे वार करूनदेखील सुदैवाने डॉक्टर जिवंत राहिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Paragliding : पद्मश्री शीतल महाजन यांच्यासोबत ‘या’ भाजप खासदाराने पॅराग्लायडिंग करून रचला इतिहास

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Related Post

महिन्याभरात होणार होतं लग्न… इमारतीखालीच आढळला होणाऱ्या बायकोचा मृतदेह; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

Posted by - March 18, 2023 0
सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असू होणाऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आपलं आयुष्य संपवलं आहे.…
Accident News

Accident News: बहिणीकडून परतत असताना काळाचा घाला; रक्षाबंधन अगोदर भावाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
वाशीम : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Accident News) अनेक घटना समोर येत…

संतापजनक ! दोन अल्पवयीन मुलांचे चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमधील घटना

Posted by - February 21, 2022 0
औरंगाबाद- खाऊ देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलांनी एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. दोन अल्पवयीन…

वारजे पुलावर विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील चारजण गंभीर जखमी

Posted by - April 14, 2022 0
पुणे- पुण्यातील वारजे पुलावर आज, गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जण…

CRIME NEWS : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण! 32 आरोपींवर मोक्का

Posted by - November 22, 2022 0
कल्याण : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणातील सर्व 32 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यातील आरोपी पंढरीनाथ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *