Pune News

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

335 0

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती (Shiv Jayanti 2024) सोमवारी साजरी करण्यात येणार आहे. ही जयंती जगभरात साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहात ही साजरी केली जाणार आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सोमवारी सकाळी सात ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलं आहे.

शिवजयंती निमित्ताने पुण्यात मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येतात. यामुळे बाजीराव रस्ता, कुमठेकर रोड, केळकर रोड व इतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. हे रस्ते बंद असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडून करण्यात आले आहे.

काय आहे पर्यायी मार्ग जाणून घेऊया
जिजामाता चौक येथून शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक टिळक चौक ते टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे.

गणेश रस्ता – दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक – दारुवाला पुल चौकातुन वाहचालकांना इच्छितस्थळी जाता येईल.

केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.

मिरवणुक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोड वरील वाहने संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीतून वळविण्यात येईल.

पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालक पुरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जातील.

मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.

मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.

मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहनांना शनिवार वाड्याकडे न जाता येणार नाहीत. या वाहचालकांनी कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे इच्छितस्थळी जावे.

 

Share This News

Related Post

Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीतील ‘हा’ उमेदवार प्रचार खर्चात अव्वल; तर ‘या’ उमेदवाराने केला सर्वात कमी खर्च

Posted by - May 16, 2024 0
पुणे : पुणे ,शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच मतदान सोमवारी पार पडले आहे. मात्र, पुणे मतदारसंघामध्ये उमेदवारांनी लाखोंने पैसे निवडणूक प्रचारात खर्च…
Nitesh Karale Guruji

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

Posted by - March 20, 2024 0
पुणे : स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी (Nitesh Karale Guruji) आता एका नव्या…

पुणे : भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचं निधन; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

Posted by - December 23, 2022 0
पुणे : भाजपाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं गुरुवारी निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास…

BIG NEWS : पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा बंद आंदोलनाला हिंसक वळण VIDEO

Posted by - November 28, 2022 0
पुणे : बेकायदा बाईक टॅक्सीच्या विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिक्षा संघटनांनी आंदोलनात सुरुवात केली आहे दरम्यान पुण्यातील या…

पुणे : वडकी नाला येथे गोडाउनला आग ; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Posted by - October 1, 2022 0
पुणे : दिनांक ०१|१०|२०२२ रोजी पहाटे ०३•२० वाजता मु.पो.वडकी नाला (पठार) येथे एका गोडाउनमधे आग लागल्याची वर्दि दलाकडे आली असता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *