Supriya Sule

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न

857 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल, गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, संसदरत्न अवाॅर्ड कमिटीच्या चेअरपर्सन आणि फाउंडेशनच्या विश्वस्त प्रियदर्शनी राहुल आदी यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार आणि संस्थेविषयी फौंडेशनचे श्रीनिवासन यांनी यावेळी माहिती दिली. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून संसदरत्न, विशेष संसदरत्न, संसद महारत्न तसेच संसद मनरत्न पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून गत १६ व्या आणि विद्यमान १७ व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात एकूण ९३ टक्के उपस्थिती लावत २४८ चर्चांमध्ये सहभाग घेतला.

तब्बल ६२९ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर १६ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना सलग आठ संसदरत्न पुरस्कार तसेच संसद महारत्न पुरस्काराने गाैरवण्यात आले आहे. खा. सुळे यांना आज प्रदान करण्यात आलेला संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार हा दहा वर्षातून एकदा देण्यात येतो. खा.सुळे यांच्या दहा वर्षाचा संसदीय कामगिरीची दखल घेऊन पुरस्कार निवड समितीचे चेअरमन संसदीय कामकाजमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील।समितीने निवड केल्यानंतर आज त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कार स्वीकारताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदाराचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत मतदार संघातील जनतेला पुरस्कार अर्पण करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘हा पुरस्कार माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघासह माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी ज्या विश्वासाने मला लोकसभेवर निवडून पाठविले. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. जनतेचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळेच हा पुरस्कार शक्य झाला आहे. म्हणूनच हा बहुमान माझ्या मतदारसंघातील जनतेला अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे’.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shivajirao Adhalarao Patil : पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील ! शिरूर मतदारसंघातून पत्ता कट?

Eknath Shinde : ‘मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी’ मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिली कबुली

Pune News : पुण्यात काँग्रेसचा पुन्हा धंगेकर पॅटर्न? ‘त्या’ पोस्टरची होतेय जोरदार चर्चा

Suhani Bhatnagar Death : ‘दंगल’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे 19 व्या वर्षी निधन

Fire In Tarapur : भयंकर स्फोटानं तारापूर हादरलं ! एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग

Pune Crime : पुणे पोलिसांकडून भाई, दादांचा होणार करेक्ट कार्यक्रम; अमितेश कुमार यांनी आखला ‘हा’ नवा प्लॅन

ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News

Related Post

Sharad Pawar

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Posted by - May 8, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे नुकतेच पार पडले तर 4 टप्पे बाकी आहेत. या दरम्यान शरद पवार (Sharad Pawar)…

काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये ;’त्या’ आमदारांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ?

Posted by - July 8, 2022 0
दिल्ली:काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला काही आमदारांनी मतदान केले नाही.त्याचबरोबर विश्वास मताच्या वेळी गैरहजर राहिल्या प्रकरणी…

सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, बैठकीत सहभागी अनेक नेत्यांनाही लागण

Posted by - June 2, 2022 0
नवी दिल्ली- सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. रणदीप सुरजेवाला…

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहूल पोकळे राष्ट्रवादीत; अजित पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Posted by - August 6, 2022 0
पुणे: शेतकरी कामगार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहूल पोकळे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत…

मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ

Posted by - June 2, 2022 0
पुणे- मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ यांची निवड करण्यात आली. मातंग एकता आंदोलनच्या राज्यव्यापी संघटनेच्या निर्धार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *