Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिश्राच्या पत्नीने केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

914 0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) हत्या प्रकरणात काल (शुक्रवारी) पहिली अटक करण्यात आली. या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मॉरिस मॉरिस नोरोन्हाचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. मिश्राला अैवध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, माझ्या नवऱ्याला यात गोवलं जात असल्याचा आरोप अमरेंद्र मिश्रा यांच्या पत्नी सोनी मिश्रा यांच्याकडून करण्यात आला आहे.

नेमक्या काय म्हणाल्या सोनी मिश्रा?
मॉरिस नोरोन्हाचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक करण्यात आल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात माझा नवरा निर्दोष असून त्याला फसवलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांचं नाव गोवलं जात आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना माझी विनंती आहे की याठिकाणी खरं काय ते शोधावं. माझ्या नवऱ्याची मदत करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती सोनी मिश्रा यांनी केली. अमरेंद्र मिश्रा यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना आतमध्ये टॉर्चर केलं जात असून मारहाण झाल्याने अंगाला सूज आल्याचंही सोनी मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमरेंद्र मिश्राला का करण्यात आली अटक?
मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला 2003 मध्ये यूपीच्या प्रयागराज मधील फुलपूर पोलिसांनी पिस्तुल परवाना जारी केला होता. त्या परवान्याची मुदत फेब्रुवारी 2026 पर्यंत होती. अमरेंद्र मिश्रा हा गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. त्याच्या पिस्तुलाचा वापर तो स्वत: आणि मॉरिस दोघेही करत होते. अमरेंद्र मिश्रा त्याचे पिस्तूल मॉरिसच्या ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवायचा. कालही त्याने त्याच लॉकरमध्ये पिस्तूल ठेवले होते. त्याच लॉकरमधून मॉरिसने पिस्तूल काढून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. हा गोळीबार झाला तेव्हा अमरेंद्र मिश्रा घटनास्थळी उपस्थित नव्हता. क्राइम ब्रँचने अमरेंद्र मिश्रा याला शस्त्रास्त्र कायदा 29 ब आणि 30 अंतर्गत अटक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shivsena : शिवसेनेच्या ‘या’ 2 आमदारांची प्रकृती बिघडली; लिलावती रुग्णालयात केले दाखल

Pune News : दुसऱ्या लग्नामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन घेतलं ताब्यात

Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य

Congress News : बाबा सिद्दीकीनंतर ‘हा’ नेता काँग्रेसची साथ सोडणार?

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

Maharashtra Politics

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा धक्का ! बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : मराठवाड्यात काँग्रेसला तर सोलापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला (Maharashtra Politics) आहे. मराठवाड्यातील नेते बसवराज पाटील आणि सोलापुरातील…

राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी- चंद्रकांत पाटील

Posted by - April 21, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला…
Harshvardhan Patil

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी

Posted by - March 4, 2024 0
इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी…
Ajit Pawar

Ajit Pawar : “आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय” अजित पवारांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मागच्या 5 वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणं इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने बदलली आहेत की, आता काहीही होऊ शकतं यावर सर्वांचाच…

मोठी बातमी! माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार

Posted by - June 13, 2022 0
मुंबई- माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *