Farmer News

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

198 0

मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात शेती करणाऱ्यांची संख्या (Crop Insurance) मोठी आहे. वादळ, महापूर, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा नुकसान सहन करावे लागते. बऱ्याचदा त्यांना दुष्काळादेखील सामना करावा लागतो. हे नुकसान कमी व्हावं, यासाठी केंद्र सरकारने पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी पिकाचा विमा उतरवू शकतात. असं केल्यास कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्या नुकसानाची भरपाई होण्यास मदत मिळते. आता ही योजना नेमकी काय आहे? त्यासाठी कसा अर्ज करायचा? यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया….

प्रधानमंत्री फसल बिमा योजना नेमकी काय आहे?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पिकावर विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्याच्या 50 टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित 50 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून देतात. या योजनेत रब्बी पिकांवर विमा संरक्षणाचा प्रीमियम 1.5 टक्के आहे. यातला शेतकऱ्याला फक्त 0.75 टक्के विमा प्रीमियम भरावा लागतो. उर्वरित रक्कम सरकार सबसिडी म्हणून देते. पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या विम्यामुळे आर्थिक मदत मिळते.

या योजनेसाठी कसा कराल अर्ज?
तुम्हाला तुमच्या जिल्हा बँकेत किंवा कृषी कार्यालयात जावं लागेल.
तिथे तुम्हाला प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा अर्ज भरावा लागेल.
फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं पीक, शेत, विम्याची रक्कम इत्यादी माहिती द्यावी लागेल.
यानंतर शेतकऱ्यांना फॉर्मसह सर्व कागदपत्रांच्या फोटो कॉपीज जमा कराव्या लागतील.
जेव्हा कृषी कार्यालय किंवा बँकेकडून अर्ज स्वीकारला जाईल, तेव्हा शेतकऱ्याला विम्याचा प्रीमियम भरावा लागेल.
विम्याचा हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्याला पीक विमा पॉलिसी मिळेल.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ?
अ‍ॅप्लीकेशन लेटर
पेरणी प्रमाणपत्र
शेतीच्या जमिनीचा नकाशा
आधार कार्ड
बँक पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Related Post

मंत्रिमंडळ बैठक : शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : राज्यात 2018-19 च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर…
heavy Rain

Maharashtra Rain : आजपासून राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - September 13, 2023 0
राज्याच्या बहुतांश भागात पावसानं (Maharashtra Rain) दडी मारली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, शेतकऱ्यांना…

औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजना

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली : “भारतातील औषधी वनस्पती: त्यांची मागणी आणि पुरवठ्याचे मूल्यांकन, वेद आणि गोराया( 2017)’ या शीर्षकाचे एक अध्ययन, भारतीय…
Maharashtra Weather

Weather Update : पुढील 24 तास खुप महत्वाचे; IMD ने हवामानाबाबत दिला ‘हा’ इशारा

Posted by - May 28, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Weather Update) मोठा फटका बसला आहे, अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…
Territorial Army

Indian Army Recruitment : लष्कराच्या टेरिटोरियल आर्मीत होणार मेगाभरती! ‘या’ प्रकारे करा अर्ज

Posted by - October 26, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने (Indian Army Recruitment) प्रादेशिक सैन्य अधिकारी पदासाठी भरतीचे नियोजन केले असून या साठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *