RBI

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

4551 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) वेळोवेळी देशातील इतर बँका आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवलं जातं. याच आरबीआयने एका बँकेवर सक्त कारवाई करत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला गेली असल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. किंबहुना बँक सध्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम त्यांना परताव्याच्या स्वरुपात देण्यास असमर्थ असल्याचंदेखील बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘या’ बॅंकेचा परवाना रद्द
आर्थिकदृष्ट्या ठेवीदारांची रक्कम परत करण्यास असमर्थ असणारी महाराष्ट्रातील ही संस्था म्हणजे जय प्रकाश नारायण नगरी सहकारी बँक बसमथनगर. 6 फेब्रुवारी 2024 रोजीच रिझर्व्ह बँकेकडून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

ग्राहकांना किती रक्कम मिळणार परत?
रिझर्व्ह बँकेच्या वतीनं महाराष्ट्रातील कमिश्नर फॉर कोऑपरेशन एंड रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव सोसायटीजला यासंदर्भातील निर्देश दिले असून जय प्रकाश नारायण नगरी सहकारी बँक बसमथनगर बंद करून एक लिक्विडेटर नियुक्त करण्यास सांगितलं आहे. लिक्विडेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खातेधारकांना डिपॉझिट इंश्योरेंस क्लेमच्या माध्यमातून त्यांची रक्कम दिली जाणार आहे. इथं 5 लाखांपर्यंतची रक्कम खातेधारकांना मिळणार असून, ही रक्कम डिपॉझिट इंश्योरेंस अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) च्या वतीनं देण्यात येणार आहे. बँकेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळं एका अर्थी खातेधारकांना सुरक्षिततेची हमीच देण्यात आली आहे. या बँकेच्या तपशीलामध्ये नोंद असल्यानुसार साधारण 99.78 टक्के खातेधारकांना त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

Akola Crime

Akola Crime : अकोल्यातील ‘त्या’ 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - August 9, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यात (Akola Crime) 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणी काजल (बदलेलं…

महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीराजेंच्या फसवणुकीचा निषेध ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

Posted by - March 21, 2022 0
महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? सरकारचं शिष्टमंडळ घेणार जरांगे पाटलांची भेट

Posted by - November 2, 2023 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा…

Pune News : यावर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडीचा थरार

Posted by - September 6, 2023 0
पुणे : श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात…

CM Eknath Shinde : लव्ह जिहाद विरोधी कायदा करणार; धर्मांतर समस्येविषयी सरकार गंभीर

Posted by - December 21, 2022 0
नागपूर : लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्र शासन निश्चिपणे कायदा करणार आहे, तसेच धर्मांतर समस्येविषयी शासन गंभीर आहे, असे स्पष्ट आश्वासन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *