Ajit Pawar

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

4712 0

 

मुंबई, दि. 1 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मनं जिंकणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आज लोकसभेत वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरला असून विकसित भारताची पायाभरणी असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

उपमुख्यंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, या अर्थसंकल्पाने 2047 पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी केली आहे. गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी कॉर्पस फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संशोधन व विकास या क्षेत्रांत नवीन उद्योग यावेत यासाठी ५० वर्षे कालावधीचे व्याजमुक्त अर्थसाह्य, त्यासाठी सरकार एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करणार तसेच राज्य सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचे ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा, या सगळ्या बाबी राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत.

प्रधानमंत्री किसान योजनेतून 11 कोटी 80 लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत, 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा लाभ, आत्मनिर्भर तेलबिया अभियानांतर्गत मोहरी, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न, दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. देशात ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम तसेच १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारी त्यांना संधी देणारी आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

Share This News

Related Post

मुख्यमंत्र्यांचे ठरले ! येत्या ९ एप्रिलला रामल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार

Posted by - April 3, 2023 0
एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मागील…
Mumbai-Pune Expressway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Posted by - December 7, 2023 0
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळच्या सुमारास एका एसटी बसचा भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway) झाला. एक्स्प्रेस वेवरील अंडा पॉईंटजवळ…

Breaking News ! उद्योगपती अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचा मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांना काल, गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.…

विशेष लेख : रोज सिंहासन पाहतोय दिगु होऊन !

Posted by - January 13, 2023 0
सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पहिलं की आपसूकच 1989 मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारण…

पुण्यात धक्कादायक प्रकार : वडिलांसमान असलेल्या काकानेच केले दोन सख्या बहिणींवर अत्याचार

Posted by - January 23, 2023 0
पुणे : कामानिमित्त दिल्लीला गेलेल्या आई-वडिलांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या काकाकडे राहण्यास ठेवले. पण वडिलांसमान असलेल्या काकांनच या मुलींचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *