भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा, १० हजारांचा दंड

562 0

अमरावती – राज्याचे माजी मंत्री भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वरुडच्या तहसीलदारांना 30 मे 2016 रोजी कार्यालयात जाऊन शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आज न्यायालयाने ही शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.

संजय गांधी निराधार योजनेत एकूण 240 प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्यामुळे वरूडचे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना जाब विचारण्यासाठी डॉ. अनिल बोंडे हे कार्यकर्त्यांसह दुपारी तहसील कार्यालय धडकले होते. यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करीत तुला जिवंत राहायचे नाही का, तू माझ्या कार्यकर्त्यांचे काम केले नाही. अशा शब्दात तहसीलदार नंदकिशोर काळे यांना धमकावले होते.

तसेच कार्यालयातील शासन निर्णयाच्या प्रती आणि शासकीय फाईल पाडून टाकल्या होत्या. या प्रकाराबाबत नंदकिशोर काळे यांनी वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यावर 11 मे 2017 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. डॉक्टर अनिल बोंडे यांना कलम 332 अंतर्गत दोषी ठरविले. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना तीन महिने कारावासाच्या शिक्षेसह दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.

Share This News

Related Post

#PUNE : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता

Posted by - March 27, 2023 0
पुणे : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्रिकेटपटू केदार…
Pune

Punit Balan Group : गणेशोत्सवानिमित्त निबंध आणि गणेश मुर्ती बनविणे स्पर्धांचे आयोजन

Posted by - September 5, 2023 0
पुणे : गणेशोत्सवानिमित्त ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ व ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्याकडून नूतन मराठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धा…
Archana Patil

Archana Patil : अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

Posted by - April 7, 2024 0
धाराशिव : धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) नव्या वादात सापडल्या आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षाने…

युपी पोलिसांनी ढेर केलेला असद अहमद कोण होता ? काय आहे याचा पूर्वइतिहास ?

Posted by - April 13, 2023 0
उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले…
Lasya Nandita

Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू

Posted by - February 23, 2024 0
सिकंदराबाद : वृत्तसंस्था – राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कार अपघातात तरुण महिला आमदार लस्या नंदिता (Lasya…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *