Padma Awards 2024

Padma Awards 2024 : पद्म पुरस्कार विजेत्यांना सरकारकडून काय-काय मिळतं?

2484 0

मुंबई : आज भारतात 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2024) घोषणा करण्यात केली आहे. यंदा 132 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 12 जणांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कार विजेत्यांना सरकारकडून नेमक्या काय-काय सुविधा मिळतात त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत…

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पाच पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कला क्षेत्र, साहित्य, क्रिडा, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांसाठी निवडण्यात येते.

पद्म पुरस्कार हा सन्मान कोणाला मिळतो?
पद्मविभूषण हा पुरस्कार अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो.
पद्मभूषण पुरस्कार उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी दिला जातो
पद्मश्री हा पुरस्कार विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. गृह मंत्रालयानुसार, भारतातील सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. मात्र, सरकारी कर्मचारी या पदावर असेपर्यंत या पुरस्कारांसाठी पात्र नसतात. फक्त डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांना यामधून वगळण्यात आले आहे.

पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांना कोणत्या सोयी मिळतात?
राष्ट्रपती भवनात या सोहळ्याचे आयोजन केले जाते. राष्ट्रपती यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते. पद्म पुरस्कार मिळणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेले प्रमाणपत्र आणि पदक दिले जाते. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना त्यांच्या मेडलची प्रतिकृतीदेखील दिली जाते. तसंच, समारंभाच्या दिवशी पुरस्कार विजेत्यांची नावे भारतीय राजपत्रात प्रसिद्ध केली जातात. मात्र, पुरस्कारप्राप्त विजेत्यांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. तसंच, रेल्वे प्रवास किंवा हवाई प्रवासाच्या सुविधाही दिल्या जात नाहीत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : ‘…तेव्हाच भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं ठरलं’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange : नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली

Chandrapur Crime : चंद्रपूर हादरलं ! ठाकरेंच्या कट्टर युवासेना शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या

CIDCO : गुडन्यूज! सिडकोकडून ‘एवढ्या’ घरांसाठी लॉटरी जाहीर

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Share This News

Related Post

शॉपिंग करताना मोबाईल नंबर देण्याची सक्ती नाही, केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचा मोठा खुलासा

Posted by - May 24, 2023 0
मॉलमध्ये जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला बिलिंग काऊंटरवर बिल Shopping देण्यापूर्वी तुमचा मोबाईल नंबर नक्कीच विचारला जातो. गरज…
WPL Auction 2024

WPL Auction 2024 : मुंबई इंडियन्सने कोट्यवधींची बोली लावून ‘या’ साऊथ आफ्रिकेच्या फास्ट बॉलरला घेतले संघात

Posted by - December 9, 2023 0
मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (WPL Auction 2024) दुसऱ्या सिझनसाठी मुंबईमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. यंदाच्या लिलाव प्रक्रियेत मुंबई…

अटल बिहारी वाजपेयी जयंती विशेष: अटलजींनी घेतलेले ५ महत्वाचे निर्णय ; ज्यामुळे भारताला मिळाली नवी दिशा

Posted by - December 25, 2022 0
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वाजपेयी यांची आज जयंती. अटलजींची जयंती गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुप्रशासन दिवस म्हणून साजरा…

साईनगरी शिर्डी : माहिती , इतिहास , महत्व ; असे पोहोचा साई दरबारी ; देवस्थानाविषयी सविस्तर माहिती

Posted by - August 29, 2022 0
अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १०…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *