Chandrapur News

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

306 0

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याने (Chandrapur News) एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरली. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. 33 हजार 258 पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले.गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या विक्रमाची दखल घेतली.

दीपोत्सवाचे जगभरातील लाखो रामभक्त साक्षीदार ठरले. पहिली रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान वाल्मिकी समाजाच्या शशी लखन, दुसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान केवट भोई समाजाच्या आशा दाते, तिसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मुस्लिम समाजाच्या चांद पाशा सय्यद, चौथी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान अनुसूचित जातीच्या प्रियंका थुल, पाचवी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान आदिवासी समाजाच्या गीता गेडाम तर सहावी रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान शीख समाजाच्या वतीने बलजीत कौर बसरा यांना मिळाला. तसेच सौ. सपना मुनगंटीवार, शलाका बिडवई यांनीही ज्योत पेटवली. त्यानंतर राम सेविकांमार्फत संपूर्ण ज्योती पेटविण्यात आल्या.

सुधीर मुनगंटीवार दिली प्रतिक्रिया
‘अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी 29 मार्च 2023 रोजी चंद्रपूर-गडचिरोलीच्या दंडकारण्यातून अतिशय पवित्र भावनेने सागवान काष्ठ पाठविण्यात आले. त्या काष्ठापासून प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाच्या महाद्वाराचे अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाच्या नावामध्ये चंद्रपूरचा चंद्र देखील आहे. प्रभू राम देशाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे विश्वविक्रमी रामज्योत प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रामज्योत सेवेची व भक्तीची आहे,’ अशा उत्स्फूर्त भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Share This News

Related Post

Mukesh Ambani

Mukesh Ambani : खळबळजनक ! मुकेश अंबानींना आला धमकीचा ई-मेल; म्हणाले ‘आम्हाला 20 कोटी द्या, अन्यथा…’

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना ई-मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे उद्योग…

मुंबईतील बसेसवर कर्नाटकची जाहिरात; रोहित पवार ट्विट करत म्हणाले…..

Posted by - December 14, 2022 0
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर…
Sharad Pawar

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Posted by - April 5, 2024 0
भिवंडी : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदासंघासाठी (Maharashtra Politics) सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना…

प्रतीक्षा संपली ! इयत्ता बारावीचा निकाल उद्या

Posted by - June 7, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं…

मंत्रिमंडळाबरोबरच पावसाळी अधिवेशनाचा देखील मुहूर्त ठरला? या तारखेपासून होणार पावसाळी अधिवेशन

Posted by - August 8, 2022 0
मुंबई: राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याती शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *