Ram Mandir Ayodhya

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

3749 0

अयोध्या : अवघा देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता अखेर तो मंगलमय क्षण आज आला आहे. आज दुपारी अयोध्येतील रामजन्मभूमीवर (Ram Mandir) राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सगळा सोहळा अगदी डोळे टिपणारा असणार आहे. प्रभू श्रीरामाचे राम मंदिर जवळपास 25 हजार फुलांनी सजवलं आहे. संपूर्ण अयोध्या नगरी लक्षावधी दिव्यांनी उजळली आहे.हे राम मंदिर ज्या शिलेदारांमुळे होत आहे त्या लोकांबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊया…

1) महंत रामचंद्रदास परमहंस
महंत रामचंद्रदास परमहंस यांनी रामजन्मभूमीवर राम मंदिर निर्माण करण्याची दूरदृष्टी योजना आखली होती. सण 1947 पासून भारताच्या स्वातंत्र्य काळात महंत फैजाबादमध्ये हिंदू महासभेचे शहर अध्यक्ष होते. 1949 पासून 1992 मध्ये बाबरी पडेपर्यंत मुख्य भूमिकेत महंत रामचंद्रदास परमहंस मुख्य भूमिकेत राहिले. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत ते प्रभू श्रीराम मंदिरासाठी संघर्ष करत राहिले.

2) अशोक सिंघल
श्रीराम मंदिर आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंहल यांनी मध्यमवर्ती भूमिका पार पाडली. अशोक सिंघल यांच्या नेतृत्वामुळे आंदोलनाला धार आली.

3) देवराहा बाबा
बाबरी मंदिराच्या विरोधात जे आंदोलन झाले त्यामध्ये देवराहा बाबा हे आघाडीवर होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी देवराहा बाबा यांच्या आदेशानंतर वादग्रस्त ठिकाणाचे कुलूप उघडल्याचे बोलले जाते.

4) महंत अवैद्यनाथ
आंदोलनात श्रीरामजन्मभूमी यज्ञ समितीचे पहिले अध्यक्ष महंत अवैद्यनाथ यांचीही मोठी भूमिका राहिली आहे. मंदिर निर्माणासाठी रामजन्मभूमी न्यासाचे ते अध्यक्षही होते.या सगळ्या शिलेदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि आज त्या देवदुर्लभ क्षणाची अनुभूती आपण सगळे घेणार आहोत.

5) लालकृष्ण अडवाणी
अयोध्या रामजन्मभूमी मोहिमेला राजकारणाचा प्रमुख केंद्रीय मुद्दा बनवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी 1990 मध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदिर ते अयोध्येतील रामजन्मभूमीपर्यंत देशव्यापी रोड शो सुरू केला होता.

6) मुरली मनोहर जोशी
मुरली मनोहर जोशी हे राम मंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा मुरली मनोहर जोशी अडवाणींसोबत होते. बाबरी मशीद पडल्यानंतर उमा भारतींना मिठी मारताना जोशींच्या छायाचित्राने त्यावेळी देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

7) उमा भारती
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भाजप नेत्या आणि मंत्री राहिलेल्या उमा भारती या राम मंदिर आंदोलनातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्या होत्या. बाबरी मशीद पाडण्याच्या भूमिकेबद्दल लिबरहान आयोगाने त्याला जमावाला चिथावणी दिल्याबद्दल दोषी ठरवले होते.

8) कल्याण सिंह
उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून कल्याण सिंह हे अयोध्या मोहिमेचे प्रादेशिक नायक होते. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर होते. त्यांनी वादग्रस्त रचनेकडे जाणाऱ्या कारसेवकांवर बळाचा वापर न करण्याचे आदेश दिले होते.

या सगळ्या शिलेदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि आज त्या देवदुर्लभ क्षणाची अनुभूती आपण सगळे घेणार आहोत. आज संपूर्ण देश ‘राममय’ झाला आहे.

Share This News

Related Post

Ajit Pawar And Sharad Pawar

NCP News : बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा आला समोर अजित पवारांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा?

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी (NCP News) खूप महत्वाचा दिवस असणार आहे. आज राष्ट्रवादीच्या (NCP News) दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार…

राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा ; महावितरणच्या प्रयत्नांना यश

Posted by - April 18, 2022 0
राज्यांत दिवसागणिक वाढत तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान व…

सावधान ! भारतात येणार कोरोनाची चौथी लाट ? 2 नवीन व्हेरिएंटबद्दल चिंता

Posted by - April 14, 2022 0
नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या कहरामुळे जग पुन्हा एकदा हैराण झाले आहे. कोरोना व्हायरसच्या Omicron प्रकाराचा BA.2 सब व्हेरिएंट सध्या जगभरात…

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि…

वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का… ; अखिलेश यादव यांचं सूचक ट्विट

Posted by - March 10, 2022 0
देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. पाच राज्यांच्या निवडणूक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *