Chhatrapati Sambhaji Nagar Accident

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त जमावाने बस पेटवली

647 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करून बस पेटवून दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमक दलाला पाचारण करून पेटवून दिलेली बसची आग विझवण्यात आली आहे. शाहरुख पठाण (वय 4 वर्षे) असे या अपघातात मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या अपघातात मृत मुलाची आईदेखील जखमी झाली आहे.

सविस्तर माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख पठाण आपल्या आईचा बोट धरून किराणा दुकानात जात होता. याचवेळी तिथून जाणाऱ्या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. ज्यात आई गंभीर जखमी झाली. मात्र, शाहरुख पठाण बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाला डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

चितेगाव येथील पांगरा रोडवर एका शाळेच्या बसने आई-मुलाला धडक दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. मुलाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेची बसची तोडफोड केली. बसच्या संपूर्ण काचा फोडण्यात आल्या. काही लोकांनी मध्यस्थी करून गर्दी पांगवली. मात्र, त्यानंतर काही अज्ञात लोकांनी बस पेटवून दिली. ज्यात बस अक्षरशः जळून खाक झाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Share This News

Related Post

crime news

स्पीकरच्या आवाजाच्या त्रासाने ज्येष्ठाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 31, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघसडकीस आली आहे. यामध्ये एका 70 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून…

जळगावमध्ये सैराट : रक्षाबंधनाच्या 2 दिवसानंतर भावानेच दाबला बहिणीचा गळा ; प्रियकराची गोळ्या झाडून हत्या

Posted by - August 13, 2022 0
जळगाव ( चोपडा ) : जळगाव मध्ये झालेल्या हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली आहे . सख्या भावानेच बहिणीचा गळा दाबून खून…
Pune Murder

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Posted by - December 22, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Murder) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये चक्क एका मित्रानेच आपल्या मित्राची…

दिलासादायक बातमी : गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांनी घट

Posted by - November 1, 2022 0
दिलासादायक बातमी : गॅस सिलेंडर म्हणजे सामान्य माणसाच्या सामान्य गरजांपैकीच एक आहे. अशातच सातत्याने वाढणारे गॅस सिलेंडरचे उच्चांकी भाव पाहता…

यासिन मलिक याला फाशी की जन्मठेप ? आज दुपारी होणार निर्णय

Posted by - May 25, 2022 0
नवी दिल्ली- काश्मिरी फुटरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता त्याच्या शिक्षेबाबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *