Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंना भाजपकडून कोणतीही ऑफर नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

454 0

सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला आणि मुलगी प्रणिती शिंदेंना भाजपने ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.‘सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मी जबाबदारीने सांगत आहे. भाजपकडून प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहेत. भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही दोन-तीन वेळा भेट झाली आहे.. पण ती गोष्ट वेगळी आहे, असं बावनकुळेंनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना श्री बावनकुळे म्हणाले की, नरेंद्र मोदी हेच अखंड भारत करू शकतात, असे उद्धव ठाकरे व संजय राऊत म्हणाले होते. ज्या काँग्रेस पार्टीने रामाला, रामसेतूला काल्पनिक म्हटले आहे अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे आहेत. ठाकरे यांच्या सर्व आक्षेपांना राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले आहे.

Share This News

Related Post

AJIT PAWAR

MAHARASHTRA POLITICS : जेव्हा अजित पवार कडाडतात ; “…म्हणून सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार…! ” वाचा काय म्हणाले आहेत अजित पवार …

Posted by - August 16, 2022 0
सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे . सध्या राज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे आणि ते…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा – मुरलीधर मोहोळ

Posted by - June 10, 2024 0
पुणे : पुणे शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत असून यामुळे शहरातील काही स्पॅाटवर पाणी मोठ्या प्रमाणावर…
Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Posted by - February 7, 2024 0
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता.…
Abu Azmi

Abu Azmi : मुस्लिम समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला तर गोळ्या घातल्या जातील; अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य

Posted by - March 4, 2024 0
मुंबई : मराठा आरक्षणापाठोपाठ आता मुस्लीम आरक्षणाची मागणीही जोर धरताना दिसत आहे. मुस्लीम समाजालाही आरक्षण द्या अशी मागणी केली जात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *