कोल्हापूर: कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोल्हापूरसह शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे या ठिकाणी हॉस्पिटलवर छापे टाकण्यात आले. यादरम्यान सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे.
गर्भातील अर्भकाचे लिंग बदलून मुलगा होण्याचं औषध देण्याचा दावा सोशल मीडियावरून केला जात होता. याशिवाय अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. कोल्हापूर मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील नगर या ठिकाणी एका घरात गर्भलिंग निधन केंद्र सुरू होते. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. के सूत्रधार असलेला बोगस डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी झाला.
कोल्हापुरातील बांबवडे येथील आनंद हॉस्पिटलचे मनोज नाईक यांच्यावर पीसीपीएनडीटी टीमने कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सिव्हिल सर्जन यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. स्टिंग ऑपरेशन मध्ये डॉक्टरच्या कारनामे उघड झाले असून गर्भपात केल्यानंतर भ्रूण मेडिकल वेस्ट मध्ये टाकून देत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू
Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू
Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार