Uddhav Thackeray : हिंमत असेल तर एकही पोलीस सोबत न घेता या; उद्धव ठाकरेंचं शिंदेना खुले आव्हान

522 0

मुंबई : आजच्या महापत्रकार परिषदेमध्ये हिंमत असेल तर एकही पोलीस सोबत न घेता या असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलं आहे. मुंबईमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालातील त्रुटी दाखवण्यात आल्या. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“अभिनव अशा जनता न्यायालयाची सुरुवात होत आहे. आजचा दिवस इतिहासात नोंद केला जाईल. शिवसेनेबाबतच्या निकालानंतर महाराष्ट्रात संतापाचं वातावरण झालं आहे. गेल्या आठवड्यात लबाडाने नव्हे तर लवादाने जो निकाल दिला त्याच्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडून आशा आहे. पण आम्ही आज जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. कारण देशात मतदार सरकार ठरवत असतो. म्हणजे सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता जनतेचीच असते,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता तरी न्याय मिळाला पाहिजे. माझं तर आव्हान आहे की राहुल नार्वेकर, मिंधे यांनी एकही पोलीस सोबत न आणता माझ्यासह जनतेत येऊन उभं राहावं. मीदेखील एकही पोलीस सोबत घेणार नाही. तिथे नार्वेकरांनी शिवसेना कोणाची आहे ते सांगावं. त्यानंतर जनतेने कोणाला पुरावा, गाढावा किंवा तुडवावा हे ठरवावं,” असा संताप उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी

Shiv Sangram : शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Ajit And Sunetra Pawar

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Posted by - April 24, 2024 0
पुणे : शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी (Shikhar Bank Loan Case) अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह इतर आरोपींना क्लीन चीट…
Ambadas Danve

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 27, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात (Ambadas Danve) आली आहे. यामध्ये 17 जणांच्या नावाचा…
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : शाहरुख खानने रचला विक्रम! ‘जवान’ अन् ‘डंकी’ने रिलीजआधी केली एवढ्या कोटींची कमाई

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केले.…

महादेव जानकर वाढवणार भाजपाची डोकेदुखी ?; बारामती लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्धार

Posted by - September 11, 2022 0
बारामती: भारतीय जनता पक्षानं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 अभियान सुरू केलं असून या बारामती लोकसभा मतदारसंघात आपलं…

शरद पवार निर्णय बदलणार? विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ‘ही’ महत्त्वाची महिती

Posted by - May 2, 2023 0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले असून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *