Pune News

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

1475 0

पुणे : पुणे शहरात (Pune News) एकामागून एक गुन्हेगारी कारवाय वाढताना दिसूत येत आहेत, काल मध्यरात्री पुणे स्टेशन परीसरात ससून रूग्णालयासमोर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पुणे शहराचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर दोन अज्ञात इसमाकंडून हल्ला करण्यात आला. सुदैवाने ते थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

याबाबतची हकीकत अशी की प्रफुल्ल गुजर हे ससून रूग्णालयात वास्तवास आहेत व ससून रूग्णालयात रूग्णसेवेकामी नागरिकांची गेली अनेक वर्षे कामे करत आहेत. काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या काही मित्रांसह ससून रूग्णालयाच्या गेटसमोर चहा घेण्यासाठी थांबलेले असताना दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात इसमांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते आपल्या दुचाकी वाहनावरून घराकडे निघालेले असताना हल्लेखारांनी त्यांच्याकडील शस्त्राने गुजर यांच्यावर हल्ला केला परंतू वेळीच सावध झाल्याने गुजर थोडक्यात बचावले. हल्लेखोर पुढे पुणे स्टेशनच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून पळून गेले. या हल्ल्यात गुजर यांच्या हाताला दुखापत झालेली असून स्टेशन परीसरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

प्रफुल्ल गुजर यांच्यावर ससून रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील तपासण्या सुरू आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारेमुळे परीसरात गोंधळ उडाला. गुजर राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने या हल्ल्यामागे काही राजकीय हेतू आहे किंवा कसे याबाबत सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी व पक्षातील सहका-यांनी केली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत बंडगार्डन पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. धनवडे करीत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Share This News

Related Post

फुगेवाडी मेट्रो स्टेशनमध्ये भरविलेल्या योग विषयक प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

Posted by - June 22, 2022 0
पुणे- जागतिक योगदिनानिमित्त भारत सरकारने देशातील ७५ ऐतिहासिक विशेष ठिकाणी योगोत्सवाचे आयोजन केले होते. पुण्यामध्ये आगाखान पॅलेस या ऐतिहासिक स्थळी…

Gang rape case : यूपीतील माजी सपा आमदार विजय मिश्रा यांच्या मुलाला पुण्यात ठोकल्या बेड्या ; एक वर्षापासून होता फरार …

Posted by - July 25, 2022 0
उत्तर प्रदेश : सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी विष्णू मिश्रा याला पुण्यात हडपसर परिसरातील ऑक्सिजन विला या आलिशान इमारतीतुन ताब्यात…

मालवाहू ट्रकला अपघात; अग्निशमन दलाकडून दोघांची सुटका

Posted by - March 5, 2023 0
पुणे:  अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुंबई-बेंगलोर हाइवे, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला असून त्यामधे दोन…

राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर, या संकेतस्थळावर पाहा निकाल

Posted by - January 29, 2022 0
पुणे- महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचा निकाल 28 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या…
Malad Crime News

Malad Crime News : मालाडमध्ये रिक्षात महिलेचा विनयभंग; 12 तासात आरोपीला अटक

Posted by - July 11, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी गोरेगावमधील आरे या ठिकाणी महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा मालाड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *