Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

839 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वाळूज परिसरातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये पोहायला गेलेल्या चार चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये दोन सख्खा भावांचा देखील समावेश आहे. त्यामुळे मृत मुलांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले.

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगावच्या दत्तनगरातील चार शाळकरी मुलांचा गुरुवारी संध्याकाळी बनकरवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (12), अफरोज जावेद शेख (14), अबरार जावेद शेख (12) व कुणाल अनिल दळवी (12) अशी मृत मुलांची नावे आहेत. सर्व मुले एकाच भागात राहत असल्याने मित्र होती. गुरुवारी दुपारी खेळण्याच्या नादात ते बाहेर पडले. उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांना बनकरवाडी तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे दिसले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी अग्निशमन विभागाला कळवले. पथकाने बुडालेल्या मुलांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले,मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतांपैकी अबरार शेख व अफरोज शेख हे दोघे सख्खे भाऊ होते. आपल्या तरुण पोरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात हंबरडा फोडला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईन; ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांनादेखील पोलिसांकडून अटक

Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Share This News

Related Post

Nasik

लग्नावरून परतताना कार नदीत कोसळून भीषण अपघात; चिमुकलीसह 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 30, 2023 0
नाशिक : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या नांदगाव-मालेगाव मार्गावर हा…
Crime

मित्र बनला वैरी; जेवणावरून झाला वाद आणि थेट….

Posted by - January 29, 2023 0
पुणे: जेवायला दिलं नाही म्हणून एकानं आपल्याच मित्राच्या कानाचा चावा घेऊन त्याचा कानच तोडल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात शुक्रवारी दुपारी…

पुण्यात फिल्मी थरार ! मैत्रिणीशी बोलतो म्हणून पठाणचा नुमविमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

Posted by - January 31, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये आज फिल्मी सीनला शोभेल असे चित्र पाहायला मिळाले. अल्पवयीन मुलाने आज नुमवी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला…

मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
मुंबई- मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली. परंतु अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो. परंतु आता मी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *