Lawyer Forum Maharashtra

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

489 0

पुणे : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ या वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह,बिबवेवाडी, पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन ॲड. डॉ. श्री. सुधाकरराव आव्हाड (जेष्ठ विधिज्ञ व मा. अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद), श्री. सुनिलजी देवधर (मा. राष्ट्रीय सचिव, भाजपा) हे उपस्थित होते. तर अ‍ॅड. राजेंद्र उमाप (उपाध्यक्ष–महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद), अ‍ॅड. हर्षद निंबाळकर (सदस्य : महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद), आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे, ॲड. सत्यजित तुपे (अध्यक्ष – लॉयर्स कंझ्युमर्स सोसायटी, पुणे) व नगरसेवक श्री. राजेंद्र शिळीमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लंडन येथे खलिस्तानी आंदोलकांच्या तावडीतुन भारतीय तिरंग्याची सुटका करणाऱ्या अ‍ॅड. सत्यम सुराणा यांचा श्री. सुनिलजी देवधर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यमक्रमाचे सुत्रसंचालन ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र ‘ चे सचिव अ‍ॅड. पवन कुलकर्णी यांनी केले तर अ‍ॅड. गणेश लोळगे यांनी आभार प्रदर्शित केले.

‘महाराष्ट्रातील वकिलांना त्यांच्या दैनंदिन व्यवसाय करताना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, फक्त वकिलांसाठी सामाजिक कार्य करणारी आणि वकिलांचे प्रश्न महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनामार्फत सोडविण्यासाठी या विधिज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली आहे’ असे संस्थापक ॲड. अतुल पाटील यांनी प्रस्तावना करताना सांगितले. याप्रसंगी अ‍ॅड. डॉ. श्री. सुधाकरराव आव्हाड, (जेष्ठ विधिज्ञ व माजी अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद) यांनी “विधिज्ञ मंचाचे रोपटे भविष्यात वटवृक्षाचे रूप धारण करील” असा विश्वास व्यक्त केला आणि विधिज्ञ मंचाने महाराष्ट्रातील वकिलांसाठी विधायक आणि उपयुक्त कार्य करण्याचा सल्ला दिला.

याप्रसंगी अॅड. राजेंद्र उमाप ( उपाध्यक्ष – महाराष्ट्र आणि आणि ॲड. हर्षद निंबाळकर (सदस्य – महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद) यांनी मनोगत व्यक्त करून “विधिज्ञ मंचाने महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती सर्व वकिलांमार्फत पोचविण्याचे आवाहन केले. तसेच महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद विधिज्ञ मंचाच्या सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करील” असे आश्वासन दिले. अ‍ॅड. सत्यम सुराणा यांचे राष्ट्रप्रेमी कृतीबद्दल कौतुक करताना श्री सुनीलजी देवधर यांनी सांगितले की ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये वैयक्तिक चारित्र्यापेक्षा राष्ट्रीय चारित्र्य महत्वाचे असते आणि सत्यम सुराणा यांचे राष्ट्रीय चारित्र्य घडविणा-या आईवडीलांचे विशेष कौतुक केले’.या कार्यक्रमासाठी विधिज्ञ मंचचे पदाधिकारी अ‍ॅड, निखिलेश दिलीप पोटे, अ‍ॅड. मनोज वासकर, अ‍ॅड. संतोष सुरेश गायकवाड, अ‍ॅड पुचा सचिन दहिते, अ‍ॅड. अमोल मोहन शेळके, ॲड. प्रशांत पांडुरंग एडके, सोलापूर, ॲड. दिनेश प्रतापसिंग राजपूत- नंदुरबार, ॲड. मयांक रामचंद्र बोडके – कोल्हापूर, अ‍ॅड.पल्लवी रामराव पाटील – अहमदनगर, अ‍ॅड. योगेश हनुमान अ‍ॅड. गव्हाणे – बीड, अ‍ॅड. नम्रता विजय खांडेकर – सातारा, ॲड. नरेंद बुधेसिंग गिरासे – जळगाव, अ‍ॅड. आशिष प्रकाश चवरे- नागपुर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.विधिज्ञ मंचाचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात संघटक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे व महाराष्ट्रातील जास्तीत जास्त वकिलांनी विधिज्ञ मंचाचे सभासद व्हावे असे आवाहन विधिज्ञ मंचाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. राहुल वंजारी यांनी केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

 

Share This News

Related Post

Pune News

Pune News : धक्कादायक! पुण्यातील काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या नावाने झाले बोगस मतदान

Posted by - May 13, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. आज राज्यात तीन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. आज चौथ्या टप्प्याचं मतदान…
Pune News

Pune News : संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप सोहळा संपन्न

Posted by - December 11, 2023 0
पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानेे…
Murlidhar mohol

Murlidhar Mohol : उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार : मुरलीधर मोहोळ

Posted by - May 8, 2024 0
पुणे : शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे…

पुणेकरांसाठी लवकरच सुरू होणार कात्रजचे राजीव गांधी प्राणी संग्रहालय

Posted by - March 15, 2022 0
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद होते. परंतु आता कोरोना ओसरल्यामुळे येत्या 20 मार्च पासून पुणेकरांसाठी राजीव गांधी…
Pune Satara Toll

Pune Satara Toll : पुणे-सातारा प्रवास महागला

Posted by - March 29, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काही निर्णय घेतले जात असतानाच एका निर्णयामुळं (Pune Satara Toll) नाराजी व्यक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *