Weather Forecast

देशातील काही राज्यात पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी !

1910 0

सध्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी कायमच आहे. IMD नुसार पंजाब आणि हरियाणासह चार राज्यांमध्ये थंडीचे दिवस असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे

राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी असल्याचे दिसू येत आहे. यासोबतच दाट धुक्यामुळे व्हिजिबिलिटी कमी होत आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमानसेवेवर मोहा प्रमाणात परिणाम सहन करायला लागतोय . प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आले . डोंगरावर बर्फवृष्टी झाल्यामुळे थंडीमध्ये वाढ होत चाली आहे. हवामान विभागाच्या माहिती नुसार , गुरुवारी म्हणजेच 4 जानेवारीला पारा खाली येईल. ह्या काळात किमान तापमान 7 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस असू शकतं. आकाश स्वच्छ राहील आणि सकाळी हलके ते मध्यम धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील या भागांत पडू शकतो पाऊस
गुरुवारच्या हवामानाविषयी बोलायचं झाल्यास, स्कायमेट वेदर रिपोर्टनुसार आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तरी छत्तीसगड आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्त्यात आहे. लक्षद्वीपमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि केरळ, तामिळनाडूचा काही भाग, कर्नाटक किनारी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या अनेक ठिकाणी थंड दिवसापासून तीव्र थंडीची स्थिती कायम राहू शकेल. पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि बिहारच्या विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यत असून राजस्थान, हरियाणा आणि पूर्व मध्य प्रदेशच्या काही भागात दाट धुके पडू शकते.असा अंदाज वर्तवण्यात आले आहे.

तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळालेरा नसून IMD नुसार पंजाब आणि हरियाणासह चार राज्यांमध्ये थंडीमुळे परिस्थिती गंभीर होणार आहे. परंतु , येत्या दोन दिवसांत परिस्थिती सुधारेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी काही तास दाट धुके राहण्याची शक्यता आहे.

ह्यासोबतच गुरुवारी पूर्व उत्तरप्रदेशच्या भागांमध्ये थंडीची स्थिती निर्माण होऊ शकते. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून IMD ने दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमधील काही ठिकाणी पावसाचा इशारा जारी केला आहे. IMD नुसार, पुढील तीन दिवसांमध्ये मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. या भागातील किमान तापमानात 2-3 डिग्री सेल्सिअसने वाढ होऊ शकते. पुढील पाच दिवसांत उर्वरित उत्तर भारतातील किमान तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही वर्तवण्यात आली.

Share This News

Related Post

दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार ? मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : दसरा मेळावा यावरून शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने अर्ज करण्यात आले होते. एखाद्या मैदानावर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी…

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा

Posted by - May 8, 2022 0
राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी उच्च व…

वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, ‘तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच…’

Posted by - May 19, 2022 0
पुणे- मनसेचे माजी शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी आताच एक फेसबुक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासोबतचा…

MURDER CASE INDAPUR : संतापजनक; वडिलांवरचा राग काढण्यासाठी 4 वर्षाच्या मुलावर घातला ट्रॅक्टर, आणि मग…

Posted by - October 27, 2022 0
इंदापूर : जमिनीच्या वादातून वडिलांशी असलेल्या वैराचा संताप अनावर होऊन बदला घेण्याच्या द्वेषाने एका नराधमाने चार वर्षाच्या चिमुकल्यावर ट्रॅक्टर घालून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *