प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी होणार; गृहमंत्री वळसे-पाटील यांचे आदेश

769 0

मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख पुत्र आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल (शुक्रवार) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रभाकर साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. पोलीस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले असल्याचे त्यांनी म्हटले.

“ही अतिशय अचानक घडलेली घटना आहे आणि यासंदर्भात निश्चितप्रकारे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत.” अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने केलेल्या या कारवाईत प्रभाकर साईल हा पंच होता. एनसीबीच्या या कारवाईवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. साईल हा एनसीबीच्या कारवाईत असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आरोप सुरू केल्यानंतर साईलने केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली होती.

एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांच्या मृत्यूबाबत चर्चा होत आहे. हा मृत्यू नसून घातपात असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर याबद्दल सीआयडी चौकशीची देखील मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासंबंधी आदेश दिले आहेत.

प्रभाकर साईल यांचा मृत्यू काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती त्यांचे वकील वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी: “…तर एकनाथ शिंदे यांना द्यावा लागू शकतो मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा;शिंदे-फडणवीस सरकारसाठी उद्या महत्त्वाचा दिवस

Posted by - July 10, 2022 0
मुंबई :11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस…

मूर्ती संकलनास पुणेकरांचा अल्प प्रतिसाद ; 5 दिवसात पुणे शहरात 27 हजार 375 गणेश मूर्तीचे विसर्जन

Posted by - September 5, 2022 0
पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू झाले आहेत. गेल्या पाच दिवसात पुणे शहरात २७…
drowning hands

Pimpri Chinchwad News : धक्कादायक ! सिंधुदुर्गमध्ये देवगड समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील 5 विद्यार्थी बुडाले

Posted by - December 9, 2023 0
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक बुडाल्याची (Pimpri Chinchwad…
PSLVC-56

ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवं मिशन! PSLV-C56 चं 30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण

Posted by - July 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो (ISRO) आता एका नवीन मोहीमेसाठी सज्ज झाले आहे. भारतीय…
Noor Malabika Death

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Posted by - June 10, 2024 0
मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये अभिनेत्री नूर मालाबिका दासने (Noor Malabika Death) आत्महत्या केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *