Top Political Events 2023

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

4469 0

मुंबई : 2023 हे वर्ष भारतातील राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारे ठरले. या वर्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. मग ते पक्षातील फूट, खासदारांचे निलंबन, राजकारण्यांच्या सभा, आंदोलने, आरोप – प्रत्यारोप यामुळे हे वर्ष मोठ्या प्रमाणात गाजले. चला तर मग राज्यातल्या आणि देशातल्या धावत्या घडामोडींवर एक नजर टाकूया….

1) NDA शी स्पर्धा करण्यासाठी I.N.D.I.A ची स्थापना
18 जुलै, 2023 रोजी, 26 विरोधी पक्षांनी युतीची घोषणा केली आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी I.N.D.I.A (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) असे नाव दिले.

2) राज्यात विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सत्तेत सहभागी झाला
2 जुलै 2023 रोजी अजित पवार आपल्या काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. सत्तेत सहभागी होताना अजित पवार यांनी वरिष्ठांकडून होत असलेलं खच्चीकरण तसेच केवळ स्वतःसाठीच सर्व काही ही भूमिका असल्यामुळे आपण वेगळी भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलं. अजित पवार यांच्यासोबत यावेळी एकूण नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली यामध्ये शरद पवारांचे अत्यंत विश्वासू दिलीप वळसे पाटील यांचा देखील सहभाग होता.

3) राहुल गांधी खासदारकी रद्द पण कोर्टाने ठरवले पात्र
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर संसद सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. ‘मोदी आडनाव बदनामी प्रकरणी’ राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली, त्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा खासदार म्हणून पात्र ठरले.

4) शरद पवारांचा राजीनामा आणि पुन्हा माघार
2 मे 2023 रोजी वाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची घोषणा केली होती. शरद पवारांनी माहिती चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमात नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे यासाठी आता आपण बाजूला होत असून नवीन कार्याध्यक्ष नेमला जावा अशी भावना व्यक्त केली होती परंतु त्याचवेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घालत शरद पवारांनी राजीनामा देऊ नये अशा भावना व्यक्त केल्या. यानंतर शरद पवार यांनी 2 दिवसांनंतर आपला राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले.

5) पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले
28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे अधिकृतपणे उद्घाटन केले. यावेळी 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण दिले नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

6) ब्रृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात कुस्तीगीरांचा निषेध
2023 ची सुरुवात भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंग यांच्यावर खेळाडूंनी लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांनी केली. एकीकडे बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक या स्टार कुस्तीपटूंनी आंदोलन करून WFI अध्यक्षांवर गंभीर आरोप केले, तर दुसरीकडे ब्रृजभूषण हे सर्व आरोप फेटाळत राहिले. अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आणि खेळाडूंचा संप मिटला. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे.

7) दक्षिणेतून भाजपचा सुपडा साफ
दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या कर्नाटक आणि तेलंगाना मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय नोंदवला आणि भाजपला सत्तेतून बाहेर काढले. काँग्रेसने कर्नाटका विधानसभेच्या 224 पैकी 135 जागा जिंकून प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन केले. कर्नाटक निवडणुकीतील पराभवाने दक्षिण भारतातील भाजपचा बलाढ्य बालेकिल्ला कर्नाटक ढासळला. तसच रेवंता रेड्डी यांच्या नेतृत्वात कांग्रेस ने 15 वर्षानंतर तेलंगणामध्ये सत्ता स्थापन केली.

8) खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
काही तरुण – तरुणींनी संसदेत गॅलरी मधून उड्या टाकून धूर कांड्या पेटवल्याची घटना घडली. यामुळे खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला तर दुसरीकडे याच घटनेवरून सरकारला प्रश्न विचारला असता तब्बल 141 खासदारांचे निलंबन करण्यात आलं. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या खासदारांचे निलंबन करण्यात आले.

9) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने अटक केली होती. दारू धोरणाशी संबंधित प्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर सिसोदिया यांनी 1 मार्च 2023 रोजी दिल्लीच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

10) महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना ‘पैशासाठी प्रश्न विचारल्या’ प्रकरणी लोकसभेच्या नीतिशास्त्र समितीच्या अहवालाच्या आधारे ‘अनैतिक आणि असभ्य वर्तन’ केल्याबद्दल सभागृहाच्या सदस्यत्वातून 8 डिसेंबर रोजी हकालपट्टी करण्यात आली. महुआ यांनी 2019 मध्ये करीमनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार झाल्या होत्या.

Share This News

Related Post

बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने आणि विचारांनी शिवसेना आणि धनुष्यबाण मोठा केला

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; वसंत मोरेंची घेतली भेट

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आज अमित ठाकरे यांनी वसंत…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली संजय राऊत यांचे भेट

Posted by - November 11, 2022 0
मुंबई : तब्बल तीन महिन्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जामीनावर सुटले आहेत. ईडीच्या कार्यप्रणालीवर न्यायालयाने…
Helicopter Crash

Helicopter Crash : हॉस्टेलवर कोसळलं सैन्यदलाचं फायटर हेलिकॉप्टर; Video आला समोर

Posted by - March 12, 2024 0
जैसलमेर : भारतीय सैन्यदलाचं हेलिकॉप्टर (Helicopter Crash) कोसळून भीषण अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जैसलमेर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या…
drowning hands

धक्कादायक ! कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत दोन मुले बुडाली

Posted by - May 21, 2023 0
पुणे : पुण्यातील कोरेगाव भीमा नदीत (Bhima river) आज (दि.21) दुपारी दीडच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *