Farmer

National Farmers Day : स्वस्त कर्जापासून सबसिडीपर्यंत शेतकऱ्यांना फायदा देतात ‘या’ 5 सरकारी योजना

3871 0

दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmers Day) साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करण्याचा आणि मानवी जीवनातील शेतकऱ्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. ‘शेतकऱ्यांचे तारणहार’ अशी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांची ओळख होती. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील बहुसंख्य लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. आज आपण अशाच काही योजनांची माहिती घेणार आहोत.

1) पंतप्रधान पीक विमा योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देणारी योजना आहे. यात अवकाळी पाऊस, गारपीट, भूस्खलन, वीज पडणे, वादळ, चक्रीवादळ यामुळं पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. केंद्र सरकारने ही योजना 13 जानेवारी 2016 रोजी सुरु केली होती.

2) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत ही योजना चालवली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

3) पीएम किसान मानधन योजना
म्हातारपणी शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पंतप्रधान किसान मानधन योजना राबवते. या योजनेंतर्गत लाभार्थींना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन म्हणून दरमहा 3000 रुपये दिले जातात. ही एक ऐच्छिक आणि अंशदानावर आधारित पेन्शन योजना आहे. यात शेतकर्‍यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात. 18 वर्षांवरील किंवा 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला मासिक 3000 रुपये किंवा वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळते.

4) किसान क्रेडिट कार्ड
भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत बँका किसान क्रेडिट कार्ड जारी करतात. खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादी शेतीशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणं हे सरकारच यामागचे उद्दिष्ट आहे. मनमानी व्याज आकारणाऱ्या सावकारांकडून शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज भासू नये, हा यामागील दुसरा हेतू आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेलं कर्ज वेळेत परत केल्यास ते 2 ते 4 टक्क्यांनी स्वस्त पडते.

5) पंतप्रधान कृषी सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नवीन तंत्रज्ञानासाठी निधी उपलब्ध करून देते. ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करून शेतकरी पाण्याचा अपव्यय बऱ्याच अंशी कमी करू शकतात. या योजनेमुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Share This News

Related Post

ई-बस नंतर आता ऑलेक्ट्रा घेऊन येणार भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक

Posted by - April 17, 2022 0
सध्या पेट्रोल-डीझेल यांच्या वाढत्या किंमती, प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना  प्राधान्य दिले जात आहे. आता पुण्याच्या रस्त्यावर ऑलेक्ट्राच्या 150…

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया… काय म्हणाले राऊत ?

Posted by - April 5, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. या कारवाई नंतर संजय…

तुमच्या आवडत्या ड्रेसवर अत्यंत चिवट डाग पडले आहेत ? कोणताही डाग असू द्या , या घरगुती उपायांनी नक्की होईल साफ

Posted by - September 2, 2022 0
गृहिणींसमोर दिवसभरामध्ये अशा अनेक समस्या उभ्या राहतात , ज्या सामान्यतः खूपच हलक्या स्वरूपाच्या वाटतात पण विचार करा तुम्ही ऑफिसला निघाले…
Mantralaya

15 ऑगस्टपूर्वी 75 हजार पदांची होणार मेघाभरती

Posted by - May 15, 2023 0
सोलापूर : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त स्वरूपात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *