पुण्यातील पाणीप्रश्नी गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

117 0

पुणे- पुणे शहरातील पाणीप्रश्नावर खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर अंकुश काकडे, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, शशिकांत जगताप, आसिफ शेख, गणेश नलावडे, सचिन शेलार, वनीता जगताप, नीता गलांडे, युसुफ शेख, संजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी खासदार बापट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट” “गिरीश बापट जवाब दो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ” “पुणे शहरात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षात शहरातील पाणीपुरवठ्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद असणे,पाणी न येणे असे प्रकार वारंवार घडत असून हे महापालिकेतील गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपचे अपयश आहे. पुणेकरांच्या या मनस्तापाला केवळ भाजप जबाबदार आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी 24×7 पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगत भाजप सत्तेत आली. आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की २४ तास तर सोडा हक्काचे १ तास सुध्दा पाणी मिळत नाही”

Share This News

Related Post

Vasant More

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Posted by - March 12, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून (Vasant More) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती, महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान,…
pune police

Pune Police : मृत्यूनंतरही देशसेवा! ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा घेतला निर्णय

Posted by - August 15, 2023 0
पुणे : मरावे परी किर्ती रुपे उरावे, हे वाक्य पुण्यातील एका (Pune Police) पोलिसानं सिद्ध केलं आहे. अपघात (Pune Police)…

“पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही”…! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका

Posted by - October 11, 2022 0
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे.…
Parbhani News

Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Posted by - April 1, 2024 0
पुणे : सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीवर हल्ला (Pune Crime News) झाल्याची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली.…

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी अनुभवसिद्ध पद्धतीने माहिती गोळा करावी

Posted by - May 21, 2022 0
पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळविलेल्या माहितीच्या आधारीतच अंतिम अहवाल केला जावा, अशा मागणीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *